आपल्या उत्तम नृत्यशैलीमुळे प्रेक्षकांच्या नजरा खिळवून ठेवणारी अभिनेत्री म्हणून मानसी नाईकला ओळखले जाते. ‘बघतोय रिक्षावाला’, ‘बाई वाड्यावर’ या गाण्यांमुळे ती प्रसिद्धीझोतात आली. गेल्या काही महिन्यांपासून ती तिच्या घटस्फोटामुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिने तिचा पती प्रदीप खरेरापासून घटस्फोट घेणार असल्याचे सांगितले. त्यातच आता मानसीच्या एका पोस्टने लक्ष वेधून घेतले आहे.

मानसी नाईक ही सोशल मीडियावर सतत सक्रीय असते. ती कायमच तिच्या खासगी, वैवाहिक आणि प्रोफेशनल आयुष्याबद्दलच्या पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच मानसीने प्रेम आणि रिलेशनशिप यावर भाष्य केले आहे. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट करत याबद्दल सांगितले आहे.

मानसी नाईकची पोस्ट

लक्षात ठेवा, तुम्ही बक्षीसाप्रमाणे आहात…नेहमीच!
तुम्ही अशा व्यक्तीबरोबर असण्यास पात्र आहात जो तुमच्याकडे दररोज लॉटरी जिंकल्याप्रमाणे पाहतो. संपूर्ण जग त्याच्यासमोर असते तरीही… त्यामुळे कधीही प्रेमाची आशा सोडू नका. प्रेम वाईट नसतं. काही लोक फक्त त्याचा गैरवापर करतात, अपमान करतात, त्याला गृहीत धरतात. तुमचा प्रेमावरील विश्वास कमी होईल असं कोणालाही वागायला देऊ नका.

कधीकधी तुम्ही निवडलेल्या हृदयाचे ठोके तुम्हाला हृदयविकाराचा झटका देऊ शकतात. त्याऐवजी त्या गोष्टी निसर्गावर सोडा, सकारात्मक व्हा. प्रेमाला तुम्हाला शोधू द्या, असे मानसी नाईकने म्हटले आहे.

View this post on Instagram

A post shared by Manasi Naik (@manasinaik0302)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मानसी नाईक आणि प्रदिप खरेरा यांचं लग्न १९ जानेवारी २०२१ ला झालं होतं. त्याआधी काही काळ दोघंही एकमेकांसह रिलेशनशिपमध्ये होते. मानसी आणि प्रदिप सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे रोमँटिक फोटो शेअर करताना दिसत होते. पण त्यानंतर त्या दोघांच्याही नात्यात दुरावा आला. यानंतर आता पुन्हा मानसी प्रेमात पडली आहे का, असा अंदाज वर्तवला जात आहे. तिच्या पोस्टमुळे तिने याचे संकेत दिले आहेत.