वेब विश्वात स्वतःची ओळख निर्माण करणारी अभिनेत्री म्हणून मिथिला पालकरला ओळखले जाते. ती नेहमी तिच्या अभिनयासह बोल्ड अंदाजासाठी ओळखली जाते. मिथिला ही कप साँगमुळे घराघरात पोहोचली. मिथिलाने ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनसृष्टीत पदार्पण केले. पण त्यानंतर ती कोणत्याच मराठी चित्रपटात झळकली नाही. नुकतंच एका मुलाखतीत मिथिलाने याबद्दल भाष्य केले.

मिथिलाने २०१७ मध्ये ‘मुरांबा’ या चित्रपटाद्वारे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले. यात ती अमेय वाघबरोबर झळकली. या चित्रपटात तिने इंदू हे पात्र साकारले होते. या चित्रपटातील तिची भूमिका प्रचंड गाजली होती. मात्र त्यानंतर तिने एकही मराठी चित्रपट केला नाही. नुकतंच महाराष्ट्र टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने याबद्दल वक्तव्य केले.
आणखी वाचा : शिवाजी साटम यांची सून आहे प्रसिद्ध अभिनेत्री, सासऱ्यांबद्दल खुलासा करत म्हणाली “लग्नानंतर त्यांनी…”

“‘मुरांबा’ हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. या चित्रपटानंतर मला अनेक मराठी चित्रपटांची ऑफर मिळाली. पण मला काहींचे विषय पटले नाहीत. तर काही चित्रपट हे आधी घेतलेल्या प्रोजेक्टमुळे करता आले नाहीत.

मला जेव्हा एखादी भूमिका मनाला पटते, तेव्हाच मी ते करते. यात मला प्रेक्षकांचीही साथ मिळते, ते मला खूप सांभाळून घेतात. मी समोरच्याला आनंद होईल किंवा कुणाचं मन सांभाळायचं, म्हणून भूमिका स्वीकारत नाही. मला जेव्हा स्वत:ला ते पात्र पटतं, तेव्हाच मी त्या चित्रपटाला होकार देते”, असे मिथिला पालकर म्हणाली.

आणखी वाचा : “एखादा पोलीस कितीही भ्रष्टाचारी असला तरी…”, मिलिंद गवळी यांची ‘ती’ पोस्ट चर्चेत

दरम्यान मिथिलाने २०१४ मध्ये ‘माझा हनिमून’ या शॉर्ट फिल्मद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यानंतर २०१५ मध्ये ती कट्टी बट्टी या हिंदी चित्रपटात झळकली. त्यानंतर ती ‘कारवां’ या चित्रपटात झळकली. यात तिने इरफान खान आणि दलकीर सलमान या अभिनेत्यांसोबत स्क्रीन शेअर केली होती. त्याबरोबरच तिने ‘लिटिल थिंग्ज’, ‘गर्ल इन द बिग सिटी’ या वेबसीरिजमध्येही काम केले होते.