लोकप्रिय अभिनेत्री मृण्मयी देशपांडे सोशल मीडिया प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. मृण्मयीने अभिनयाचा ठसा उमटवत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अभिनयाबरोबरच सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करणाऱ्या मृण्मयीने एका वेगळ्याच गोष्टीने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
मृण्मयी सध्या महाबळेश्वरमध्ये निसर्गाच्या सानिध्यात घर बांधत आहे. यापूर्वीही तिने फोटो शेअर करत शेतात घर बांधत असल्याची माहिती दिली होती. आता मृण्मयीने तिच्या व्हिडीओ शेअर करत तिच्या घराची झलक दाखविली आहे. मातीच्या विटांनी उभारलेल्या मृण्मयीच्या घराला चक्क चुन्याचं प्लास्टर करण्यात आलं आहे. मृण्मयीच्या या ड्रीम होमचं काम अजूनही पूर्ण झालेलं नाही. परंतु, या व्हिडीओमध्ये तिच्या घराची झलक पाहायला मिळत आहे.
हेही वाचा>> सुश्मिता सेनने खरेदी केली नवी मर्सिडीज कार, किंमत ऐकून थक्क व्हाल
हेही वाचा>> मुंबईच्या ट्राफिकबाबत अक्षया देवधरची पोस्ट, फोटो शेअर करत म्हणाली “आता शेंगदाणे विकू…”
मृण्मयीच्या स्वप्नातील निसर्गाच्या सानिध्यातील टुमदार घर लवकरच पूर्ण होणार आहे. या घराला बाल्कनीही करण्यात आली आहे. त्याबरोबरच घरासमोर औषधी वनस्पतींचं छोटं गार्डनही तयार करण्यात येणार आहे. भाज्यांची शेतीही मृण्मयीच्या घराबाहेर करण्यात येणार आहे.
हेही वाचा>>के.एल.राहुल-अथिया शेट्टीच्या लग्नाचा मंडप सजला! सुनील शेट्टीच्या खंडाळ्यातील बंगल्याचा व्हिडीओ समोर
मृण्मयीने शेअर केलेल्या या व्हिडीओवर चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत. अनेकांनी मृण्मयीचं हे फार्म हाऊस आवडलं असल्याचं सांगत कमेंट केल्या आहेत. मृण्मयीने आजवर अनेक मालिका, चित्रपट व नाटकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे.