मुंबई म्हणलं की आपल्याला अनेक गोष्टी आठवतात. गर्दी, लोकल, वडापाव यांबरोबर एक गोष्ट आवर्जून आठवते ती म्हणजे तिथल्या रस्त्यांची दूरवस्था. मुंबईतील रस्त्यांवर मोठमोठाले खड्डे पडले आहेत. मुंबईत वाहनधारकांना सगळ्यात जास्त त्रास सहन करावा लागतो तो खड्ड्यांचा. सामान्य माणसांपासून कलाकारांपर्यंत प्रत्येक जण या खड्ड्यांना वैतागला आहे. यापूर्वी अनेक कलाकारांनी या खड्ड्यांबाबत पोस्ट शेअर करत आपला राग व्यक्त केला होता. आता आणखी एका प्रसिद्ध अभिनेत्रीने खड्ड्याबाबत पोस्ट शेअर केली आहे.

मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे मुक्ता बर्वे. आपल्या अभिनयाच्या जोरावर मुक्ताने प्रेक्षकांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर मुक्ता नेहमी सक्रिय असते. निरनिराळ्या पोस्ट शेअर करत ती आपले मत मांडत असते. तसेच तिच्या नवनवीन प्रोजक्टबाबतही मुक्ता चाहत्यांना अपडेट देत असते. दरम्यान मुक्ताने शेअर केलेल्या नव्या पोस्टने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

हेही वाचा- “…तर मी आज दिसले नसते”, मोठ्या अपघातातून ‘अशा’ सावरल्या सुकन्या मोने, प्रसंग सांगत म्हणाल्या, “अंधत्व आलं, स्मृती गेली… “

मुक्ताने आपल्या इन्स्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये मुक्ता रिक्षात बसल्याचे दिसून येत आहे. तिने तोंडेला स्कार्फ बांधला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने याला एक भन्नाट कॅपशनही दिली आहे. मुक्ताने लिहिले “आताआपण शिकुया ‘बसल्याजागी करायचा नाच’ – यासाठी लागणारं साहित्य रिक्षा, खड्डे आणि खड्यातून वाट काढत जाणारा रस्ता” हा व्हिडीओ शेअर करत तिने मुंबईच्या रस्त्यांच्या दूरवस्थेवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे. मुक्ताचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. अनेक चाहत्यांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.

मुक्ताच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास, आत्तापर्यंत तिने अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. मालिका चित्रपट, नाटकामंधून मुक्ता प्रेक्षकांचे मनोरंजन करत आली आहे. ‘जोगवा’, ‘मुंबई-पुणे मुंबई’, ‘व्हाय’, ‘डबल सीट’, ‘आम्ही दोघी’, ‘स्माईल प्लीज’ चित्रपटांमधील तिची भूमिका चांगलीच गाजली. तिच्या ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘अग्निहोत्र’, ‘अजूनही बरसात आहे’ या मालिकांना प्रेक्षकाचे भरभरुन प्रेम मिळाले. सध्या मुक्ताचे ‘चार चौघी’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. या नाटकात तिच्याबरोबर पर्ण पेठे, रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम यांच्या प्रमुख भूमिका आहेत.