निवेदिता सराफ मराठी मनोरंजनसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. आत्तापर्यंत त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सोशल मीडियावर निवेदिता नेहमी सक्रिय असतात. व्हिडीओ आणि पोस्टच्या माध्यमातून त्या चाहत्यांनी अपडेट देत असतात. लग्नानंतर निवेदिता यांनी १४ वर्ष अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला होता. या ब्रेकनंतर निवेदिता यांनी पुन्हा जोशाने पुनरागमन केलं. पण या ब्रेक दरम्यान निवेदिता यांनी नेमकं केलं काय? आणि वयाच्या ५८ वर्षात त्या अजूनही का काम करतात? या प्रश्नाच उत्तर निवेदिता यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिला आहे.

हेही वाचा- “सिनेमा प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात कमी पडलो…” ‘आत्मपॅम्फ्लेट’च्या दिग्दर्शकाची पोस्ट चर्चेत

निवेदिता यांनी नुकतीच नवरात्रोत्सवानिमित्त राजसी मराठीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्यांनी लग्नानंतर अभिनयातून घेतलेल्या ब्रेकवर भाष्य केलं आहे. निवेदिता म्हणाल्या, “मी लग्नानंतर १४ वर्ष फक्त संसार केला. लग्नानंतर मी पूर्णवेळ घर सांभाळलं. मुळात मी स्पर्धा हा प्रकारच मानत नाही. कारण मी आता त्या स्टेजवर आहे जिथं मला पैसा कमावण्यासाठी काम करायचं असं नाही. किंवा कुणाशी स्पर्धा करायलं हवी असंही अजिबात नाही. आता जे मी काम करते ते मी मानसिक समाधानासाठी मिळावं यासाठी करते.”

निवेदिता आणि अशोक सराफ यांनी अनेक चित्रपटात एकत्र काम केले. दोघांमध्ये १८ वर्षांच अंतर आहे. ‘नवरी मिळे नवऱ्याला’ या चित्रपटाच्या शूटींगच्यावेळस त्यांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. पुढे जाऊन दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण निवेदिताच्या आईचा या लग्नाला विरोध होता. १९९० मध्ये गोव्यातील मंगेशीच्या देवळात जाऊन निवेदिता आणि अशोक सराफांनी लग्नगाठ बांधली. लग्नानंतर निवेदिता सराफ यांनी तब्बल १४ वर्षांचा अभिनयातून ब्रेक घेतला होता. लग्नानंतर निवेदिता यांनी त्यांचा एकुलता एक मुलगा अनिकेत सराफ याच्या पालनपोषणाची जबाबदारी घेतली होती.

हेही वाचा- “गडकरी कमी अन् फडणवीस जास्त…”, ‘गडकरी’ चित्रपटाच्या ट्रेलरवर चाहते नाराज, म्हणाले “त्यांच्या नावाला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवेदिता यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, निवेदिता यांनी मालिका, चित्रपट, नाटकांमधून आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. सध्या त्या ‘भाग्य दिले तू मला’या मालिकेत निवेदिता सराफ रत्नमाला मोहिते ही भूमिका साकारत आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरली आहे. याचबरोबर त्यांची ‘अग्गबाई सासूबाई’, ‘अग्गबाई सूनबाई’ मालिका खूपच गाजली. मराठीबरोबर निवेदिता यांनी हिंदी चित्रपटांमध्येही काम केलं आहे. सपनों से भरे नैना’, ‘ये जो है जिंदगी’, ‘केसरी नंदन’ सारख्या हिंदी मालिकांमधील त्यांची भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या.