बरेच कलाकार अजूनही नवीन वर्ष साजरं करताना दिसत आहेत. बॉलीवूडपासून काही मराठी कलाकार परदेशात नवीन वर्ष साजरं करत आहेत. त्यापैकी एक म्हणजे ‘कलरफुल’ अभिनेत्री अशी ओळख असणारी पूजा सावंत. पूजा सावंत २०२५ हे नवं वर्ष आपल्या आई-वडील आणि सासरच्या मंडळींबरोबर साजरं करताना दिसत आहे. याचदरम्यान अभिनेत्रीच्या आई-वडिलांनी पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातील नव्या प्रशस्त घराला भेट दिली. याचा व्हिडीओ सध्या व्हायरल झाला आहे.

अभिनेत्री पूजा सावंत गेल्यावर्षी २८ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकली. तिने सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधून आयुष्याच्या नव्या प्रवासाला सुरुवात केली. सध्या पूजा वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसत आहे. अभिनेत्रीचा पती कामानिमित्ताने ऑस्ट्रेलियात राहतो. त्यामुळे पूजा कधी ऑस्ट्रेलिया तर कधी मुंबईत असते.

हेही वाचा – Video: “माझं नाव घेऊन एका मुलीच्या चारित्र्यावर…”, अखेर शालीन भनोटने ईशा सिंहबरोबरच्या अफेअरच्या चर्चांवर सोडलं मौन, म्हणाला…

२०२५ या नव्या वर्षांचं स्वागत करण्यासाठी पूजा आपल्या कुटुंबाला घेऊन ऑस्ट्रेलियात पोहोचली. आई, बाबा, भाऊ, बहीण आणि सासरच्या मंडळींबरोबर पूजाने नवीन वर्षांचं स्वागत केलं. याचे फोटो, व्हिडीओ तिने सोशल मीडियावर शेअर केले होते. नुकतंच पूजाच्या आई-वडिलांनी तिच्या ऑस्ट्रेलियातील नव्या प्रशस्त घराला भेट दिली. याचा व्हिडीओ पूजाची बहीण रुचिरा सावंतने शेअर केला आहे.

रुचिराने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये, पूजाचे आई-वडील लेकीचं घर पाहून भारावून गेल्याचं पाहायला मिळत आहेत. दोघं घराच्या पाया पडून आतमध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. हा खास क्षणाचा व्हिडीओ पूजा करताना दिसत आहे. त्यानंतर देवघर, किचन, हॉल असं सर्वकाही पूजा आई-बाबांना दाखवत आहे.

हेही वाचा – Video: “मला लागली कुणाची उचकी…”, हातात काठी घेऊन ऊसाच्या फडात ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्रीचा डान्स, पाहा व्हिडीओ

हेही वाचा – Bigg Boss 18: फॅमिली वीकमध्ये झालं एविक्शन, चुम दरांगच्या आईची खरी ठरली भविष्यवाणी, ‘हा’ सदस्य झाला घराबाहेर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पूजा सावंतच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ती काही महिन्यांपूर्वी ‘मुसाफिरा’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. पुष्कर जोग दिग्दर्शित ‘मुसाफिरा’मध्ये तिने मेघाची भूमिका साकारली होती. या चित्रपटात पूजासह पुष्कर जोग, स्मृती सिन्हा, पुष्कराज चिरपुटकर, दिशा परदेशी झळकले होते. त्यानंतर पूजा ‘क्रॅक’ चित्रपटातील एका गाण्यात विद्युत जामवालबरोबर डान्स करताना दिसली. मग पूजाचं मोठ्या थाटामाटात लग्न झालं. लग्नानंतर काही दिवसांसाठी ती ऑस्ट्रेलियात राहत होती. पण ती पुन्हा मुंबईत परतली. त्यानंतर पूजाचं ‘नाच गो बया’ गाणं ५ जुलैला प्रदर्शित झालं. तिचं हे गाणं सुपरहिट झालं.