अभिनेत्री रिंकू राजगुरु सध्या ‘झिम्मा २’ या चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. या चित्रपटात तिने तानिया ही भूमिका उत्तमरित्या साकारली आहे. त्यामुळे सध्या ‘झिम्मा २’ चित्रपटातील तिच्या कामाचं कौतुक केलं जात आहेस. अशातच रिंकूच्या आई-बाबांनी तिला खास सरप्राइज दिलं आहे. याचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरु सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिच्या आगामी कामाबद्दल आणि दैनंदिन जीवनातील गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करत असते. सध्या तिचे लाल रंगातल्या साडीतले फोटो चांगलेच व्हायरल झाले आहेत. केसात गजरा, हातात हिरवा चुडा, नाकात नथ असा अस्सल मराठमोळा अंदाज तिच्या या नव्या फोटोशूटमध्ये पाहायला मिळत आहे. दुसऱ्याबाजूला रिंकूच्या आई-बाबांनी तिला खास सरप्राइज दिलं आहे.

हेही वाचा – अल्लू अर्जुन ‘पुष्पा २: द रुल’साठी घेणार नाही मानधन, पण तरीही कमवणार कोट्यावधी रुपये; कसे काय? जाणून घ्या…

रिंकूने आई-बाबांनी दिलेल्या खास सरप्राइजचा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीला शेअर केला आहे. रिंकूच्या आई-बाबांनी तिला आयफोन १५ प्रो मॅक्स (iphone 15 pro max) दिला आहे. याचा फोटो शेअर करत रिंकूने लिहीलं आहे, “या सरप्राइजसाठी आय लव्ह यू आई-बाबा.” याचं स्टोरीच्या पुढे रिंकूने आणखी एक पोस्ट शेअर केली आहे; ज्यामध्ये आई-बाबा मुलीची काळजी घेताना दिसत आहेत आणि त्यावर लिहीलं आहे की, या पृथ्वीतलावर तुमच्या आई-बाबांपेक्षा अधिक प्रेम तुमच्यावर कोणीच करू शकत नाही.

हेही वाचा – सिद्धार्थ मल्होत्राने पत्नी कियारासाठी केला खास पदार्थ; अभिनेत्री फोटो शेअर करत म्हणाली, “कधीच इतका…”

हेही वाचा – तमन्ना भाटियाशी लग्न कधी करणार? अभिनेता विजय वर्मा म्हणाला, “मी…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिने ‘सैराट’ चित्रपटानंतर अनेक चित्रपट केले. ‘झुंड’, ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारून तिने पुन्हा एकदा प्रेक्षकांची मनं जिंकली. इतकं नाहीतर तिने ओटीटीच्या दुनियेतही पदार्पण केलं. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली. यामध्ये तिने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.