Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025 : संपूर्ण देशाचे आराध्यदैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज ३९५वी जयंती आहे. त्यामुळे संपूर्ण देशभरात शिवरायांच्या जयंती उत्साहाने साजरी केली जात आहे. ठिकठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. शिवजयंती ( Shiv Jayanti ) निमित्ताने अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) नुकतीच सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर केली आहे. तिने अनोखी मानवंदना शिवरायांना दिली आहे.
मराठी, हिंदी आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीत छाप उमटवणारी सोनाली कुलकर्णी ( Sonalee Kulkarni ) नेहमी चर्चेत असते. सोनालीने आपल्या अभिनयाबरोबरच सुंदर नृत्याने, अदांनी प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. सोनालीला महाराष्ट्राची लाडकी अप्सरा म्हणून ओळखलं जातं. अशा या प्रसिद्ध अभिनेत्रीने नुकतीच शिवजयंती निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे.
“पुन्हा सुदूर पसरवू, महाराष्ट्राची कीर्ति…शिवरायांची स्मरुन मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती…छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्व शिवभक्तांना शुभेच्छा”, असं कॅप्शन लिहित सोनाली कुलकर्णीने ( Sonalee Kulkarni ) शिवजयंती चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. या पोस्टबरोबर तिने एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये सोनाली कुलकर्णी लाठी-काठी खेळताना दिसत आहे. त्यानंतर अभिनेत्री गारद देताना पाहायला मिळत आहे. सोनालीचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आला आहे.
View this post on InstagramThis quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, सोनाली कुलकर्णीच्या ( Sonalee Kulkarni ) कामाबद्दल बोलायचं झालं, गेल्या वर्षी सोनालीने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवलं. ‘मलाइकोट्टई वालीबान’ या चित्रपटाच्या निमित्ताने सोनाली पहिल्यांदाच मल्याळम चित्रपटसृष्टीत झळकली. २५ जानेवारी २०२४ला सोनालीचा हा पहिला दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील तिच्या कामाचं चहूबाजूने कौतुक झालं. तिच्या ‘मोगलमर्दिनी छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सोनाली स्वराज्य सौदामिनी छत्रपती ताराराणी या मुख्य भूमिकेत झळकणार आहे.