ज्येष्ठ मराठी अभिनेते मनमोहन माहिमकर हे सध्या चर्चेत आहेत. माहिमकर काका म्हणून त्यांना सर्वत्र ओळखले जाते. सध्या मात्र त्यांना काम मिळत नसल्याची तक्रार त्यांनी केली आहे. याचा एक व्हिडीओ प्रसिद्ध मराठी इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता वालावालकरने शेअर केला होता. आता त्यांचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे.

अंकिताने नुकतंच इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत मनमोहन माहिमकर हे रडत असल्याचे दिसत आहेत. यावेळी अंकिता ही माहिमकर काकांना “रडू नका, आता आपल्याला अजिबात रडायचं नाही. आता लढायचं आहे”, असे सांगताना दिसत आहे.
आणखी वाचा : “‘बाईपण भारी देवा’मध्ये माझ्याबरोबर झळकलेली ती मुलगी…”, अखेर सोहम बांदेकरने दिले स्पष्टीकरण; म्हणाला, “आई माझ्यावर…”

“काकांना काम मिळावं यासाठी आमचे प्रयत्न चालूच आहेत. त्यांचा स्वेच्छा मरणासाठी दिलेला अर्जही मी हातात घेतला. त्यांना असा अर्ज आपल्याला यापुढे करायचा नाही. आज त्यांनी त्यांचे फोटो, जुने आर्टिकल या सर्व गोष्टी मला दाखवल्या. प्रसारमाध्यमांची लोकही त्यांच्यापर्यंत पोहोचतात. त्यांना लवकरात लवकर काम मिळावं, अशी मी आशा बाळगते”, असे तिने या व्हिडीओत म्हटले आहे.

अंकिताने हा व्हिडीओ शेअर करताना “एक कलाकार” असे कॅप्शन दिले आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर अनेकजण कमेंट करत तिचे कौतुक करत आहेत.

आणखी वाचा : “पोरी मला इच्छामरणही चालेल, पण…” ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने ‘कोकण हार्टेड गर्ल’कडे मांडली व्यथा, अंकिता म्हणाली “मी सिनेसृष्टीपर्यंत…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान मनमोहन माहिमकर यांनी ‘नानामामा’, ‘गोलमाल’, ‘जत्रा’, ‘भिकारी’, ‘ही पोरगी कोणाची’, ‘यंदा कर्तव्य आहे’, ‘वंटास’ यासारख्या अनेक मराठी चित्रपटात काम केले आहे. त्याबरोबरच काही नाटकातही ते झळकले होते.