मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मनोरंजनविश्वाशी फार जवळचा संबंध आहे. राज ठाकरेंना चित्रपट बघण्याची आवड असल्याचंही अनेकदा त्यांनी मुलाखतीत सांगितलं आहे. राज ठाकरेंच्या पत्नी शर्मिला ठाकरे सध्या चर्चेत आहेत. त्यांनी रितेश देशमुख व जिनिलीयाच्या ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक केलं होतं.

रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपट ३० डिसेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाने कोटींची कमाई करायला सुरुवात केली आहे. या चित्रपटाने ‘सैराट’चाही रेकॉर्ड मोडला आहे. त्यांच्या या चित्रपटाची भूरळ शर्मिला ठाकरे यांनाही पडली आहे. रितेश व जिनिलीया चित्रपटगृहांत जाऊन प्रेक्षकांचे आभार मानत आहेत. नुकतंच त्यांनी दादर येथील प्लाझा चित्रपटगृहांत ‘वेड’ चित्रपटाच्या शोदरम्यान हजेरी लावली. यावेळी रितेश व जिनिलीयाने पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शर्मिला ठाकरेही उपस्थित होत्या. ‘वेड’ चित्रपटासाठी शर्मिला ठाकरे यांनी प्लाझा हे थिएटर बुक केलं होतं.  

हेही वाचा>> “माझी राजकीय पार्श्वभूमी असल्याने…”, गाणं प्रदर्शित होण्याआधीच अमृता यांना देवेंद्र फडणवीसांनी सांगितलेली ‘ती’ गोष्ट

हेही वाचा>> तरुणांनी धुडगूस घातल्यानंतर गौतमी पाटीलने कार्यक्रम थांबवला, व्हिडीओ आला समोर

रितेश म्हणाला, “प्लाझा चित्रपटगृहाबरोबर अनेक आठवणी आहेत. लहानपणी मी आईवडिलांबरोबर या थिएटरमध्ये यायचो. ‘अशी ही बनवाबनवी’ हा चित्रपटही मी प्लाझामध्येच पाहिला होता. याआधी मी ‘लय भारी’ चित्रपटाच्या शोदरम्यानही प्लाझाला आलो होतो. आता वेडला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे. त्यांचे मी आभार मानतो”.

हेही वाचा>> “नंगानाच आणि फॅशन…”, उर्फी जावेदच्या कपड्यांवरुन चित्रा वाघ पुन्हा संतापल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंनी ‘वेड’ चित्रपटातील गाणी किंवा ट्रेलर पाहून काही प्रतिक्रिया दिली का?, असा प्रश्न रितेशला विचारण्यात आला. यावर उत्तर देत तो म्हणाला, “राज ठाकरे सध्या कामामध्ये व्यग्र आहेत. मी राज ठाकरे यांच्याबरोबर ‘वेड’ चित्रपट पाहण्याची इच्छा व्यक्त केली. मी शर्मिला ठाकरे यांनाही याबाबत विचारलं होतं. मी एका शोबाबत विचारलं, त्यांनी ‘वेड’ चित्रपटासाठी संपूर्ण थिएटरच बुक केलं”.