प्रसिद्ध लेखिका, समीक्षक तसेच अभिजात साहित्य लीलया हाताळणाऱ्या डॉ. वीणा देव म्हणजेच अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांच्या आईचं गेल्यावर्षी २९ ऑक्टोबर, २०२४ रोजी अल्पशा आजाराने निधन झालं. पुण्यातील शाहू मंदिर महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून मृणाल कुलकर्णी यांच्या आई डॉ. वीणा देव कार्यरत होत्या. याठिकाणी त्यांनी ३२ वर्षे अध्यापनाचं कार्य केलं.

आईच्या निधनानंतर मृणाल यांनी “तिची उणीव जरी भासली तरी, तिने जोडलेल्या मोठ्या मित्रपरिवाराच्या आणि तिने लिहिलेल्या अनमोल कलाकृतींच्या रुपाने तिची सोबत कायम असेल” अशी भावुक पोस्ट शेअर केली होती. त्यानंतरही अनेकदा मृणाल आपल्या आईच्या आठवणीत व्यक्त झाल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा मृणाल यांनी आईची आठवण व्यक्त केली आहे.

मृणाल यांनी नुकताच मुक्काम पोस्ट मनोरंजन या युट्यूब वाहिनीशी संवाद साधला. या संवादादरम्यान त्यांना आईबद्दलची आठवण विचारण्यात आली. याचं उत्तर देत मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “माझी आई खूप वेगळी आई होती. तिच्या वेगवेगळ्या आठवणी सतत मनामध्ये येत असतात. सगळ्यात जास्त अभिमान मला या गोष्टीचा वाटतो की, माझे आई-वडील शिक्षक होते. त्या दोघांनीही अनेक विद्यार्थी घडवले. त्यांच्या हाताखाली अनेक विद्यार्थी शिकून मोठे झाले.”

यापुढे मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, “माझ्या आई-वडिलांनी आपली मुलं आणि विद्यार्थी यात कधीच काही फरक केला नाही. म्हणजे प्रत्येक माणूस तो आहे त्यापेक्षा वर कसा जाईल यासाठी ते कटिबद्ध होते. असे शिक्षक त्या मुलांना लाभले आणि आम्हाला असे आई-बाबा लाभले याबद्दल मी स्वत:ला खूपच भाग्यवान समजते. कारण आता सतत जाणवतं की, त्यांनी केलेल्या त्या संस्करांचे काय फायदे होते किंवा अजूनही होत आहेत.”

यापुढे मृणाल कुलकर्णींनी सांगितलं, “फक्त लहानपणीच मुलांवर संसार करायचे असतात आणि मग ती मोठी होतात असं नाही. माझ्या आईने माझ्यावर केलेला शेवटचा म्हणता येईल असा संस्कार म्हणजे, आजारी माणसाशी कायम प्रेमानेच बोलायचं. कारण तो माणूस आतल्या आत अनेक समस्या झेलत असतो.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यापुढे त्या म्हणाल्या, “आजारी माणसाच्या डोक्यात इतकी वादळे चाललेली असतात की, त्यांना तुमचं एखादं सहज बोललेलं वाक्यसुद्धा लागू शकतं. आणि हे फक्त आजारी माणसांबद्दलच नाही तर आपल्या घरातील वयोवृद्ध माणसांशीच चांगलं बोलावं. आपलं वाक्य एखाद्याला का लागावं आणि विशेषत: ज्यांनी आपल्याला घडवलं