प्रेम व मैत्री या अनोख्या नात्याची गोष्ट सांगणारा ‘मुसाफिरा’ चित्रपट येत्या २ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच पुष्कर जोग आपल्याला अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक अशा तिन्ही जबाबादाऱ्या पार पाडताना दिसणार आहे. काही दिवसांपूर्वीच अभिनेत्याने ‘मुसाफिरा’चा ट्रेलर व पहिलं पोस्टर लॉन्च केलं. यावर नेटकऱ्यांच्या विविध प्रतिक्रिया आल्या आहेत.

मराठी मनोरंजनसृष्टीत सध्या एकापेक्षा एक दमदार स्टारकास्ट असणारे चित्रपट प्रदर्शित होत आहेत. पुष्कर जोगच्या ‘मुसाफिरा’बरोबर सिद्धार्थ-सईची प्रमुख भूमिका असलेला ‘श्रीदेवी प्रसन्न’ चित्रपट रिलीज होणार आहे. यावरून एका नेटकऱ्याने पुष्करच्या पोस्टवर कमेंट करत “आम्ही तर श्रीदेवी प्रसन्न पाहणार” असं लिहिलं होतं. या नेटकऱ्याला उत्तर देत अभिनेता म्हणाला, “हो चालेल…तो सुद्धा माझाच मराठी चित्रपट आहे. नक्की बघा” या कमेंटचा स्क्रीनशॉट पुष्करने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर शेअर केला होता.

pushkar
पुष्कर जोग इन्स्टाग्राम स्टोरी

हेही वाचा : “अतिशय गलिच्छ राजकारण”, किरण मानेंनी मांडलं स्पष्ट मत; उद्धव ठाकरेंबद्दल म्हणाले, “साथीदार सोडून गेल्यावर…”

पुष्करने शेअर केलेल्या ‘मुसाफिरा’च्या पोस्टरवर आणखी एका युजरने अशाच प्रकारची कमेंट केली होती. “मराठी चित्रपट आणि नाव असं का देता तुम्ही लोक? इथेच तुम्ही मॅच हरता” नेटकऱ्याच्या या कमेंटवर अभिनेता जशाच तसं उत्तर देत म्हणाला, “हिंदीमध्ये सुद्धा चित्रपटाचं नाव अ‍ॅनिमल होतं. ते चित्रपट बघायला जातोस ना…”

pushkar jog
पुष्कर जोग

हेही वाचा : लेक घरी नसताना जावयाने गर्ल गँगसह केली पार्टी; अंकिता लोखंडेच्या आई म्हणाल्या, “विकीने त्या सर्वांना…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ‘मुसाफिरा’ चित्रपटाबद्दल सांगायचं झालं, तर यामध्ये पुष्कर जोगसह पूजा सावंत, स्मृती सिन्हा, दिशा परदेशी व पुष्कराज यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. याचं संपूर्ण शूटिंग स्कॉटलँड येथे झालेलं आहे. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होईल.