झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित, सुधाकर रेड्डी यक्कंटी दिग्दर्शित ‘नाळ २’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टर, टीझर आणि गाण्याला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसत आहे. आता या चित्रपटातील आणखी एक गाणं प्रदर्शित झालं आहे. ‘डराव डराव’ असे या गाण्याचे बोल आहेत.

नाळ २ चित्रपटातील हे दुसरं गाणं आहे. हे गाणं बच्चे कंपनीवर चित्रीत करण्यात आलं आहे. चैतू, चिमू आणि मणी यांची या गाण्यात धमाल पाहायला मिळत आहे. या गाण्यात चिमुकली चिमूने सर्वांचेच विशेष लक्ष वेधून घेतले आहे. यात एवढीशी गोड मुलगी तिच्या भावंडांसोबत धमाल करत आहेत. तिच्यातील हा गोडवा, निरागसता भावणारी आहे. ‘आई मला खेलायला जायचंय’ या गाण्याप्रमाणे हे गाणेही आपल्याला बालपणात रमवेल. आता या गाण्यामुळे ‘नाळ भाग २’ बघण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे.
आणखी वाचा : Naal 2 Teaser : मोठा झालेला चैतू, खऱ्या आईची ओढ, अन्…; ‘नाळ २’ चित्रपटाचा टीझर पाहिलात का?

या गाण्याचे बोल वैभव देशमुख यांचे असून या गाण्याला ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांनी संगीत दिले आहे. तर या जबरदस्त गाण्याला जयेश खरे आणि मास्टर अवन यांचा आवाज लाभला आहे. यापूर्वी ‘नाळ’ या चित्रपटातील गाण्यांनी प्रेक्षकांना वेड लावले होते. आता ‘नाळ भाग २’ मधील गाणीही प्रेक्षकांच्या पसंतीस येत आहेत.

आणखी वाचा : खऱ्या आईला भेटायला गेलेला चैतू, गावकऱ्यांचं प्रेम अन्…; नागराज मंजुळेंच्या ‘नाळ २’ मधील पहिलं गाणं प्रदर्शित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या गाण्याची खासियत म्हणजे या गाण्याला लाभलेला नवोदित गायकाचा आवाज. मुळात नागराज मंजुळे हे आपल्या चित्रपटांमध्ये नेहमीच नवोदितांना संधी देतात आणि हे कलाकार या संधीचे सोने करतात. असाच हिरा ए. व्ही प्रफुल्लाचंद्रा, नागराज मंजुळे आणि सुधाकर यंकट्टी यांना जयेश खरेच्या रूपात सापडला आणि झी स्टुडिओजने त्याला संधी दिली. सारेगमपमध्ये जयेश स्पर्धक आहे आणि तिथेच या सर्वांनी त्याला हेरले. खरं तर जयेश खरेने अल्पावधीतच स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. येत्या दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.