विनोदाचं अचूक टायमिंग साधत रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी गुणी अभिनेत्री म्हणून नम्रता संभेरावला ओळखलं जातं. नाटक, मालिका, विनोदी कार्यक्रम इथून सुरू झालेला तिचा प्रवास आता चित्रपटांपर्यंत येऊन पोहोचला आहे. लवकरच नम्रता ‘नाच गं घुमा’ चित्रपटाच्या माध्यमातून एका आगळ्या वेगळ्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यानिमित्ताने तिने नुकतीच राजश्री मराठीला मुलाखत दिली. यावेळी अभिनेत्रीने एक खास खुलासा केला.

नम्रता म्हणाली, “मी पहिल्यांदाच याबद्दल सांगतेय…मी मध्ये एक ऑडिशन दिली होती. खरंतर मी तिथपर्यंत पोहोचले ही गोष्ट माझ्यासाठी खूप मोठी आहे. मला माहिती नाही मी सिलेक्ट होईन की नाही. पण, मी तिथे पोहोचले हेच माझ्यासाठी खूप आहे. मला आमिर खान प्रोडक्शनमधून फोन आला होता की, सिनेमाची ऑडिशन आहे. मी सुद्धा त्याठिकाणी गेले. तिथे जाऊन मला असं समजलं की, स्वत: आमिर खानने माझं नाव सजेस्ट केलंय. तिकडच्या टीमने मला तसं सांगितलं.”

हेही वाचा : महादेव बेटिंग ॲपप्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, अभिनेता साहिल खानला छत्तीसगडमधून अटक

अभिनेत्री पुढे म्हणाली, “त्यांना माझा फोन नंबर कुठूनही मिळत नव्हता. काहीच संपर्क होईना म्हणून त्यांनी मला इन्स्टाग्रामवर मेसेज केला. तो मेसेज रिक्वेस्टमध्ये गेला होता. मी एक दिवस रिक्वेस्टमधले मेसेज पाहिले तेव्हा मला समजलं. त्या मेसेजमध्ये माझा फोन नंबर मागितला होता. त्यानंतर प्रोडक्शनमधून मला त्यांचा फोन आला. ते म्हणाले, २० दिवस झाले आम्ही तुमच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि आमिर खान सरांनी नाव सजेक्ट केल्याने आम्ही तुम्हाला शोधत होतो.”

हेही वाचा : Video : माधुरी दीक्षित अन् करिश्मा कपूरचा ‘चाक धूम धूम’ गाण्यावर जबरदस्त डान्स! नेटकऱ्यांना आठवला शाहरुख खान, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी थोडीफार चौकशी केली तेव्हा मला समजलं की, ते ( आमिर खान ) आमचा कार्यक्रम पाहतात आणि त्यांना माझं काम आवडतं म्हणून त्यांनी नाव सुचवलं होतं. आता एक दिवस त्यांना भेटेन. त्या चित्रपटाचं काय होईल मला माहिती नाही…मी ऑडिशन तर दिलीये आणि मुख्य खलनायिकेसाठी ती ऑडिशन होती. आता काय होतंय ते मला थोड्या दिवसांत कळेलच” असं नम्रता संभेरावने सांगितलं.