scorecardresearch

“त्याच्या धर्मामुळे…”, ‘पठाण’च्या यशानंतर शाहरुख खानचा फोटो शेअर करत हेमांगी कवीची पोस्ट

Pathaan Movie: हेमांगी कवीने शाहरुख खानसाठी केलेली पोस्ट चर्चेत

hemangi kavi on shah rukh khan pathaan
हेमांगी कवीची पोस्ट चर्चेत. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड किंग शाहरुख खानचा ‘पठाण’ चित्रपट २५ जानेवारीला सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटातून शाहरुखने तब्बल चार वर्षांनंतर रुपेरी पडद्यावर दमदार कमबॅक केलं आहे. शाहरुख खानच्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. चित्रपटगृहांत ‘पठाण’चे शो हाऊसफूल होताना दिसत आहेत.

शाहरुखच्या ‘पठाण’ला मिळालेलं यश पाहून मराठमोळी अभिनेत्री हेमांगी कवीने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. हेमांगी शाहरुखची चाहती आहे. हेमांगीने इन्स्टाग्रामवरुन शाहरुख खानचा फोटो शेअर करत त्याच्यासाठी खास पोस्ट लिहिली आहे.

तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा! अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आलीये पण आता ती थांबवुया. काय? त्याच्या धर्मामुळे, त्याच्या non conventional Hero looks मुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहिले आहेत. मी त्याची चाहती आहे कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केलं. याहून बालिश प्रकार मी पाहीला नाही. असो.
मला वाटतं या द्वेषाचं मूळ कारण हे लोक अनाहुतपणे स्वतःला त्याच्याशी compare करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असून ही इतका यशस्वी कसा? आणि आता तर या वयातही!!!
सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घरबसल्या घरी बसणाऱ्या लोकांना चित्रपटगृहांमध्ये आणणे हे हाच करू जाणे!
स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम (भल्या भल्यांनाही जमला नसता) त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ्फ अपन तो पहलेसे लुटे हुए थे, अब तो पुरे बरबाद हो गए!
पन्नाशी नंतर retirement चे plans करून मोकळे झालेल्यांनो द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया!
तुमच्या ५७ व्या वर्षी जर तुम्ही २०-२२ वयाच्या मुला-मुलींना नाचवू शकत असाल, वेड लावू शकत असाल तर पुढे बोला!
बाकी…
झूमे जो पठान मेरी जान,
महफ़िल ही लूट जाए!

You were, You are & You will be forever…Baazigar!

हेही वाचा>> रितेश देशमुखच्या चित्रपटातील गाण्यावर मुलीने बनवलेला व्हिडीओ संजय राऊतांनी केला शेअर, म्हणाले “वेड…”

हेही वाचा>> ‘पठाण’ हे देशाचं यश आहे म्हणणाऱ्याला शाहरुख खानने दिलं उत्तर, म्हणाला “हिंदुस्तान…”

हेमांगी कवीने शाहरुख खानसाठी लिहिलेली ही पोस्ट सध्या चर्चेत आहे. या पोस्टवर अनेकांनी कमेंटही केल्या आहेत.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा ( Marathi-cinema ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-01-2023 at 16:03 IST
ताज्या बातम्या