scorecardresearch

‘पठाण’ हे देशाचं यश आहे म्हणणाऱ्याला शाहरुख खानने दिलं उत्तर, म्हणाला “हिंदुस्तान…”

शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे.

shah rukh khan pathaan ask srk (1)
शाहरुख खानच्या 'पठाण'ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानच्या ‘पठाण’ चित्रपटाची क्रेझ संपूर्ण देशात पाहायला मिळत आहे. ‘पठाण’चे शो हाऊसफूल होत आहेत. चार वर्षांनंतर शाहरुख खानने मोठ्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे. शाहरुखच्या चाहत्यांकडून या चित्रपटाला उस्फुर्त प्रतिसाद मिळत आहे.

‘पठाण’ला मिळणारा प्रतिसाद पाहून शाहरुखने ट्विटरवर #AskSRK सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये एका चाहत्याने “प्रेमाला धर्म, भाषा, प्रदेश अशी कोणतीच सीमा नसते, हे ‘पठाण’ने सिद्ध केलं आहे. ‘पठाण’ हे तुमचं यश आहे, देशाचं यश आहे. मला खात्री आहे, भारत व भारतीयांना जोडण्यासाठी तुम्ही आणखी प्रयत्न कराल”, असं ट्वीट केलं होतं.

हेही वाचा>> डेव्हिड वॉर्नरलाही पडली ‘पठाण’ची भूरळ; शाहरुख खानचा चेहरा एडिट करत क्रिकेटरने लावला स्वत:चा फोटो, व्हिडीओ शेअर करत म्हणाला…

शाहरुखने चाहत्याच्या या ट्वीटला उत्तर दिलं आहे. “आपल्या सगळ्यांचे आई-वडील एकच आहेत. आपण भारत…हिंदुस्तानचे पुत्र आहोत. फक्त हे एकच सत्य आहे”, असं शाहरुखने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा>> नाना पाटेकरांवर जडलेलं मनीषा कोईरालाचं प्रेम; पण अभिनेत्याला दुसऱ्याच अभिनेत्रीबरोबर रुममध्ये पाहिलं अन्…

शाहरुखच्या ‘पठाण’ने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवशी ५४ कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटाने अवघ्या तीनच दिवसांत जगभरात ३०० कोटींचा गल्ला जमवला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-01-2023 at 19:41 IST