अभिनेत्री पूजा सावंत लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. काही दिवसांपूर्वी साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर करत तिने आपल्या चाहत्यांना गुडन्यूज दिली होती. अभिनेत्रीच्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सिद्धेश चव्हाण असून तो कामानिमित्त ऑस्ट्रेलियात असतो. गेल्या वर्षभरापासून पूजा-सिद्धेश एकमेकांच्या संपर्कात आहेत. अभिनेत्रीने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिच्या होणाऱ्या नवऱ्याविषयी भाष्य केलं आहे.

पूजा सावंतने होणाऱ्या नवऱ्याबद्दल तिच्या मित्र-मैत्रिणींना कधी सांगितलं याबद्दल लोकमत फिल्मीला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. अभिनेत्री म्हणाली, “अनेक दिवस मी सिद्धेशच्या संपर्कात होते पण, आमच्या नात्याबद्दल आणि लग्न करणार असल्याचं सर्वप्रथम मी गौरी महाजनीला सांगितलं होतं. गौरी म्हणजे गश्मीर महाजनीची बायको. ती माझी अनेक वर्षांपासून घट्ट मैत्रीण आहे. त्यामुळे सिद्धेशबद्दल मी सर्वात आधी तिला सांगितलं. भूषण-वैभवला सुरूवातीला काहीच माहिती नव्हतं.”

हेही वाचा : “मराठी भाषेत व्हिडीओ टाक”, टीका करणाऱ्यांना आर्या आंबेकरचं उत्तर, म्हणाली, “ही फसवणूक…”

पूजा पुढे म्हणाली, “सोशल मीडियावर मी जेव्हा फोटो शेअर केले त्याच्या एक महिनाआधी मी या नात्याबद्दल भूषण-वैभवला सांगितलं होतं. त्यांना काहीच माहीत नसल्याने सिद्धेशबद्दल ऐकल्यावर ते दोघंही शॉक झाले होते. कारण, माझ्या आयुष्यात एवढ्या गोष्टी घडत आहेत याची त्यांना काहीच कल्पना नव्हती.”

हेही वाचा : Video: अखेर ‘तो’ क्षण आलाच! मुक्ता-सागरच्या मेहंदी सोहळ्यात सई आली अन्…; सगळेच झाले भावुक

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आता माझे सगळे मित्र सिद्धेशला भेटलेत. ते सगळेजण माझ्यासाठी प्रचंड आनंदी आहेत. कारण, मला लग्न करण्याची इच्छा आहे हे या सगळ्यांना माहिती होतं. भूषण, वैभव, गश्मीर, अभी, प्रार्थना, गौरी हे माझे मित्र माझ्यापेक्षा जास्त माझ्या लग्नासाठी उत्सुक आहेत.” असं पूजाने सांगितलं. दरम्यान, पूजा सावंत पुढच्या वर्षी सिद्धेश चव्हाणशी लग्नगाठ बांधणार आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या साखरपुड्यांच्या फोटोंवर मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसह नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे.