राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आज (२२ जानेवारी) अयोध्या शहर सजले आहे. देशभरात उत्साहाचं वातावरण आहे. पंतप्रधान मोदींच्या हस्ते राम मंदिरात प्रभू श्रीराम यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाईल. अयोध्येतील राम मंदिराचे आज उद्घाटन होत असल्याने राजकारणी, खेळाडूंसह कलाकारही त्यांच्या भावना व्यक्त करत आहे. मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीने राम मंदिरासंदर्भात एक पोस्ट केली आहे.

प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे, अशी भावना प्राजक्ताने व्यक्त केली आहे.
शतकांच्या यज्ञातून उठली
एक केशरी ज्वाळा…
दहा दिशांच्या ह्रदयामधूनी
अरुणोदय झाला…
२२ जानेवारी २०२४.

सगळं सुंदर, मंगलमय, पावित्र्यपुर्ण असू दे; प्राणप्रतिष्ठा शांततेत पार पडू दे. ही प्रत्येक “भारतीयाची” भावना असू दे, अशी पोस्ट प्राजक्ता माळीने केली आहे.

Video: बिग बी, रणबीर-आलिया, विकी-कतरिना अन्…; राम मंदिर प्रतिष्ठापना सोहळ्यासाठी बॉलीवूड सेलिब्रिटी अयोध्येला रवाना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्राजक्ता माळीच्या या पोस्टवर चाहत्यांनी ‘जय श्री राम’ अशा कमेंट्स केल्या आहेत. चाहत्यांनी या पोस्टवर लाइक्सचा वर्षाव केला आहे. दरम्यान, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोशल मीडियावरही युजर्स राम मंदिर प्राणप्रतिष्ठेसंदर्भात पोस्ट करत आहेत.