महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री प्राजक्ता माळी अनेकदा चर्चेत असते. ‘जुळून येती रेशीमगाठी’ या झी मराठी वाहिनीवरील मालिकेमुळे प्राजक्ताला प्रेक्षकांचं खूप प्रेम मिळालं. अनेक मालिका, चित्रपट, वेब सीरिज करत प्राजक्ताने आपल्या चाहत्यांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. प्राजक्ता सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. सोशल मीडियावर प्राजक्ता अभिनयाबरोबरच तिच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही चाहचत्यांबरोबर शेअर करत असते.

नुकतेच प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एका कागदपत्रांवर सही करतानाचे फोटो शेअर केले आहेत. यात तिच्या शेजारी तिची आईदेखील आहे. या पोस्टला कॅप्शन देत तिने लिहिलं, “२७ एप्रिल २०२४ रोजी सर्वात आवडत्या, बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली. ही विवाह नोंदणी अजिबात नाही. या क्षणी माझे हृदय कृतज्ञतेने भरले आहे.”

हेही वाचा… “मला चार दिवस रडायचं होतं…”, शर्मिन सेगलने सांगितला ‘हीरामंडी’ शूटदरम्यानचा ‘तो’ किस्सा, म्हणाली…

प्राजक्ताने शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते तर्कवितर्क लावून आपली आवडती अभिनेत्री नक्की कशावर सही करतेय याच्या प्रतिक्रिया कमेंट्स सेक्शनमध्ये दिल्या आहेत. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, “अजून दहा वर्षाचं हास्यजत्रेचं कॉन्ट्रॅक्ट असावं” तर खूप जणांनी विचारलं, नवीन घर किंवा फार्महाऊस घेतलंय का?” तर एकाने “कोर्ट मॅरेज १००%” अशी कमेंट केली.

हेही वाचा… ठरलं! सलमान खानच्या ‘सिकंदर’मध्ये ‘या’ दाक्षिणात्य अभिनेत्रीची लागली वर्णी, चाहत्यांना गुड न्यूज देत म्हणाली…

एकाने मजेशीर कमेंट करत लिहिलं, “फरसाणची मोठी ऑर्डर मिळाली वाटतं” तर एकजण म्हणाला,”अच्छा म्हणजे आता अमुल पोस्टरवर त्या मुलीच्या जागी तुमचा फोटो दिसणार”

प्राजक्ता माळीचा ‘प्राजक्तराज’ नावाचा मराठमोळ्या अलंकारांचा ब्रॅंड आहे. तसचं ‘प्राजक्ताकुंज’ नावाचं तिचं एक फार्महाऊसदेखील आहे.

हेही वाचा… “मी शिव्या देतोय? तू काय मला धमकी…”, विक्रांत मेस्सी आणि टॅक्सीचालकाचं झालं जोरदार भांडण, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, प्राजक्ता सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्यजत्रा या कॉमेडी शोमध्ये सूत्रसंचालनाची धुरा सांभाळते आहे. तर तीन अडकून सीताराम या चित्रपटात प्राजक्ता शेवटची झळकली होती. या चित्रपटात प्राजक्तासह वैभव तत्ववादी, संकर्षण कर्हाडे, हृषिकेश जोशी,आलोक राजवाडे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.