प्रशांत दामले यांची ‘जादू तेरी नजर’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, ‘गेला माधव कुणीकडे’ अशी अनेक नाटकं रंगभूमीवर अजरामर ठरली आहेत. आजही त्यांची प्रमुख भूमिका असलेल्या नाटकांच्या प्रयोगाला हाऊसफुलची पाटी असते. नाटक असो, मालिका किंवा चित्रपट प्रत्येक माध्यमांवर प्रशांत दामलेंनी प्रेक्षकांचं नेहमीच निखळ मनोरंजन केलं.

प्रशांत दामले सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. आपल्या नाटकांबद्दलचे विविध अपडेट्स ते फेसबुकच्या माध्यमातून चाहत्यांना देत असते. याशिवाय सवडीनुसार त्यांच्या पोस्टवर कमेंट्स करणाऱ्यांना ते आवर्जुन उत्तरं देत असतात. सध्या प्रशांत दामलेंनी एका युजरला दिलेलं असंच एक गमतीशीर उत्तर चर्चेत आलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ : सायली-अर्जुनच्या जाळ्यात प्रिया अडकेल का? दोघांनी बनवली खास योजना, विशेष भागाचा प्रोमो आला समोर

प्रशांत दामले यांनी फेसबुकवर नुकतीच एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नाटकाच्या आगामी प्रयोगांबद्दल माहिती दिली होती. यावर एका युजरने गमतीत कमेंट केली आहे. “प्रशांत दामले सर, गंमत म्हणून विचारत आहे अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का हो?” असा प्रश्न विचारणाऱ्या नेटकऱ्याला अभिनेत्याने पण मजेशीर उत्तर दिलं आहे. “नाटक पण अर्धच बघता येईल” असं प्रतिउत्तर देत प्रशांत दामलेंनी पुढे हसायचे इमोजी जोडले आहेत.

prashant damle
प्रशांत दामले यांनी दिलं मजेशीर उत्तर

हेही वाचा : “मेहनत आणि शिस्त…”, श्वेता शिंदेने सांगितला अशोक सराफ यांचा किस्सा; म्हणाली, “नाटकाच्या तालमीला…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, नाटकाच्या ऑनलाइन तिकीट बुकिंगसाठी प्रशांत दामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच तिकिटालय हे अ‍ॅप सुरू केलं आहे. प्रेक्षकांना या ॲपवर आपल्या सोयीनुसार नाटकाची व सिनेमांची तिकीटं बुक करता येणार आहेत.