Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding: अभिनेता प्रथमेश परबने काल, २४ फेब्रुवारीला क्षितीजा घोसाळकरबरोबर लग्नगाठ बांधली. १४ फेब्रुवारीला दोघांचा साखरपुडा झाला होता. तेव्हापासून दोघांच्या लग्नाकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. काही दिवसांपूर्वी लग्नाआधीचे विधी सुरू झाले होते. मेहंदी, हळद, मांडवस्थापना असे कार्यक्रम झाले. त्यानंतर काल अखेर प्रथमेश व क्षितीजा लग्नबंधनात अडकले. सध्या दोघांच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

प्रथमेश परब व क्षितीजा घोसाळकरच्या रिसेप्शनमधील काही व्हिडीओ समोर आले आहेत. ज्यामध्ये अभिनेत्याची रिसेप्शनमधील बायकोसह एन्ट्री आणि त्यानंतर शाहरुख खानच्या गाण्यांवर जबरदस्त डान्स पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ Ellora Banquets या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे.

Harsha Bhogle's reaction to Hardik Pandya
IPL 2024 : ‘त्याची चूक काय…’, हार्दिकवर होणाऱ्या टीकेवर दिग्गज समालोचक संतापला, टीकाकारांना दाखवला आरसा
Zomato account suspension leaves delivery agent in tears on eve of sister’s wedding
बहिणीच्या लग्नाआधीच बंद झालं डिलिव्हरी बॉयचं खातं; ढसा ढसा रडणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ पाहून झोमटोने दिले उत्तर
Anand Mahindra speaks about his daughter suffered an injury moment Harsh Goenka agrees Watch Ones
लेकीच्या दुखापतीच्या ‘त्या’ प्रसंगाने आनंद महिंद्रांना शिकवला ‘हा’ धडा; म्हणाले, ‘घराच्या अंगणात…’
madhuri dixit killer dance moves on premika ne pyar se song
Video : “प्रेमिका…”, प्रभूदेवाच्या व्हायरल गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, धकधक गर्लची नेटकऱ्यांना भुरळ

हेही वाचा – सोनाली कुलकर्णीचा नवरा करतो ‘हे’ काम, अभिनेत्री खुलासा करत म्हणाली…

या व्हिडीओत, प्रथमेश रिसेप्शनमध्ये बायको क्षितीजाबरोबर एन्ट्री करताना ‘मला वेड लागले प्रेमाचे’ या गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहे. त्यानंतर अभिनेता शाहरुख खानच्या ‘ये दिल दिवाना’, ‘तुमसे मिलके दिल का’ या गाण्यांवर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

हेही वाचा – Video: लग्न मंडपातील प्रथमेश परब-क्षितीजा घोसाळकरच्या ‘त्या’ कृतीने सगळ्यांचं वेधलं लक्ष, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, लग्नात प्रथमेश व क्षितीजा पारंपरिक लूकमध्ये पाहायला मिळाले. क्षितीजाने पिवळ्या रंगाची नऊवारी नेसली होती. ज्यावर गुलाबी रंगाची शाल घेतली होती. या लूकमध्ये तिचं सौंदर्य खुलून आलं होतं. तसंच प्रथमेशने बायकोला मॅचिंग करण्यासाठी गुलाबी रंगाचं धोतर नेसून त्यावर पांढऱ्या रंगाचा कुर्ता घातला होता. ज्यावर त्याने गुलाबी व पिवळ्याचा रंगाचा फेटा बांधला होता.