Prathamesh Parab And Kshitija Ghosalkar Wedding: ‘टाइमपास’ चित्रपटातून लोकप्रिय झालेला दगडू अर्थात प्रथमेश परब याच्या लग्नाला अवघे काही तास बाकी आहेत. उद्या २४ फेब्रुवारीला तो लग्नबंधनात अडकणार आहे. १४ फेब्रुवारीला प्रथमेशचा मोठ्या थाटामाटात साखरपुडा पार पडला. तसंच नुकतीच त्यांची हळदी झाली. त्यानंतर काल अभिनेत्याची होणारी बायको क्षितिजा घोसाळकरला हळद लागली. तिने हळदीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले असून चांगले व्हायरल झाले आहेत.

“गजर झाला दारी, साजनाची स्वारी…साजनाची स्वारी आली लाज गाली आली….” असं ‘सैराट’ चित्रपटातील गाण्याच्या ओळी कॅप्शनला लिहित क्षितिजा घोसाळकरने हळदीचे फोटो शेअर केले आहेत. हळदीसाठी प्रथमेशच्या होणाऱ्या बायकोने खास लूक केला होता. तिने पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. ज्यावर फुलांची ज्वेलरी घातली होती. क्षितिजाने हळदीतील खास क्षणाचे फोटो शेअर केले असून त्यावर प्रथमेशने प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा – श्रद्धा कपूर झाली आत्या! पद्मिनी कोल्हापूरेंच्या सुनेनं दिली गोड बातमी, घरी झालं नव्या पाहुणीचं आगमन

प्रथमेशच्या प्रतिक्रियेवरून त्याला लग्नाची फारचं घाई झाल्याचं दिसत आहे. क्षितिजाच्या हळदीच्या एका पोस्टवर अभिनेत्याने लिहिलं आहे, “माझं गं ते…किती गोड…चल पटकन लग्न करुया.” तसेच प्रथमेशने दुसऱ्या पोस्टवर प्रतिक्रिया दिली आहे, “आय लव्ह यू टू.”

हेही वाचा – सुरेश वाडकरांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ प्रदान, म्हणाले, “मी खूप…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, प्रथमेशची होणारी बायको क्षितिजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितिजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितिजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची होणारी बायको झळकली होती.