मोहसिन खान दिग्दर्शित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट आजपासून प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात अभिनेता प्रथमेश परब, पृथ्वीक प्रताप आणि अंकिता लांडेपाटील प्रमुख भूमिकेत पाहायला मिळत आहेत. पहिल्या दिवशी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. अशातच प्रथमेश परबची होणारी बायको क्षितिजा घोसाळकरने ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटबाबत पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

अभिनेता प्रथमेश परबची गर्लफ्रेंड क्षितिजा घोसाळकरने सोशल मीडियावर ‘डिलिव्हरी बॉय’ चित्रपटावर प्रतिक्रिया दिली. चित्रपटाच्या प्रीमियर दरम्यानचे प्रथमेशबरोबरचे फोटो शेअर करत क्षितिजाने लिहिलं, “सरोगसी सारखा अत्यंत महत्त्वाचा आणि संवेदनशील विषय, त्यावर चित्रपट बनवणं आणि तरीही मूळ विषयाला कुठेही गालबोट न लावणं, त्यातही विनोद, इमोशन हे परफेक्ट टिकवून ठेवणं…खरंच ‘डिलिव्हरी बॉय’च्या संपूर्ण टीमला सलाम…प्रथमेश मला तुझा खूप अभिमान आहे. या चित्रपटासाठी तू घेतलेली मेहनत मी जवळून बघितली आहे. आणि ती सगळी मेहनत, चित्रपटमधल्या प्रत्येक फ्रेममध्ये दिसून येते. ज्या कन्विक्शनने तू दिगंबर कानतोडे परफॉर्म केलायस त्याला तोड नाही. तुझी भाईगिरी, स्वॅग आणि स्क्रीनवरचा वावर, खूपच कमाल आहे. सर्वात चांगला परफॉर्मन्स केला आहे.”

हेही वाचा – लग्नाआधीच्या व्हॅलेंटाईन डेला तितीक्षा तावडेचा प्लॅन काय? म्हणाली, “सिद्धार्थबरोबर…”

“तुझ्या आणि पृथ्वीक प्रतापच्या अभिनयाची जुगलबंदी म्हणजे खूपच भारी..वेडे आहात दोघेही. तुम्हाला बघणं म्हणजे visual treat आहे. अशा अनेक चित्रपटामध्ये तुम्हाला एकत्र बघायला आवडेल. पृथ्वीक खरंच भन्नाट परफॉर्मन्स…अंकिता खूप नॅचलर आणि स्क्रीनवरचा सुंदर वावर…फारच गोड.. “तू आई होणार” हे गाणं फारच सुंदर आणि आर्या आंबेकरने ते कमाल गायलंय..मी हा चित्रपट प्रचंड एन्जॉय केला. हसून हसून डोळ्यात पाणी येत होतं तर काही सीन्सला फक्त एका डायलॉगने किंवा काही rections pause व्हायला होत होतं…मी निशब्द झाले… हा मास्टरपीस चुकवू नका…तुमच्या जवळच्या चित्रपटगृहामध्ये जाऊन ही आनंदाची डिलिव्हरी नक्की अनुभवा,” असं क्षितिजाने लिहिलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा – ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ फेम शिवानी रांगोळे व्हॅलेंटाईन डे कसा करणार साजरा? म्हणाली, “आमचा…”

दरम्यान, येत्या १४ फेब्रुवारीला प्रथमेश-क्षितिजाचा साखरपुडा होणार आहे. त्यानंतर २४ फेब्रुवारीला दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत. त्यामुळे सध्या प्रथमेश-क्षितिजाच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे.