मराठी कलाविश्वातील दगडू म्हणजेच प्रथमेश परब आणि क्षितीजा घोसाळकर यांचा लग्नसोहळा २४ फेब्रुवारीला पार पडला. त्यांच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. अभिनेता प्रथमेश परब हा सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. अभिनयासह त्याच्या वैयक्तिक आयुष्यातल्या गोष्टीही तो चाहत्यांबरोबर शेअर करत असतो.

प्रथमेशने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर आहे. ज्यात त्याची पत्नी क्षितीजा त्याला हेड मसाज करून देतेय. प्रथमेशच्या केसांना तेल लावून मस्त मालिश करताना त्याची पत्नी दिसतेय. “लग्नानंतरचं सुख” असं या व्हिडीओवर लिहिलं आहे. तर “सुख म्हणजे नक्की हे असतं” असं कॅप्शन प्रथमेशने या व्हिडीओला दिलं आहे. प्रथमेश आणि क्षितिजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल होतोय.

प्रथमेश आणि क्षितिजाच्या या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियादेखील आल्या आहेत. “एक वर्ष होऊ दे, मग कळेल सुख की दुःख” अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे. “दगडूचे मसाजचे पैसे वाचले” असं दुसऱ्याने कमेंट करत लिहिलं. “क्या बात है वहिनी आणि भाऊ.. मज्जा आहे” असं तिसऱ्या युजरने लिहिलं. “म्हणजे तू पराजू बरोबर टाईमपास केला”, “नव्याची नवलाई…मज्जा करून घे” अशाप्रकारच्या अनेक कमेंट्स या व्हिडीओवर नेटकर्यांच्या आल्या आहेत.

हेही वाचा… शाहरुख खानला पडली ‘या’ क्रिकेटरच्या हेअरस्टाईलची भुरळ; अभिनेता म्हणाला, “मला अशीच…”

दरम्यान, प्रथमेश-क्षितीजाच्या लव्हस्टोरीबद्दल सांगायचं झालं तर, दोघांची पहिली ओळख इन्स्टाग्रामवर झाली. त्यानंतर इन्स्टाग्रामवर गप्पा मारत-मारत दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. ‘टाइमपास ३’च्या चित्रीकरणादरम्यान पहिल्यांदाच प्रथमेश व क्षितीजा भेटले. यानंतर दोघांची मैत्री आणखी दृढ झाली आणि मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यामुळे आता दोघांनी संसार थाटायचा निर्णय घेतला.

हेही वाचा… “हा काय वेडा झालाय का?”, ‘त्या’ फोटोमुळे अंकिताचा पती विकी जैन झाला ट्रोल

प्रथमेशची बायको कोण आहे?

प्रथमेशची बायको क्षितीजा फॅशन मॉडेल आहे. तसेच ती बायोटेक्नॉलिजिस्ट आणि सामाजिक कार्यकर्ती आहे. क्षितीजाला लिखाणाची खूप आवड आहे. तिला खगोलशास्त्राचा अभ्यास करण्यात रस आहे. क्षितीजा कोटक फाऊंडेशनच्या उन्नती या एनजीओमध्ये काम करते. ‘गजर तुझा मोरया’ या लोकप्रिय गाण्यात प्रथमेशची बायको झळकली होती.