आज आषाढी एकादशी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सपत्निक पंढरपूरमधील विठुरायाच्या मंदिरात शासकीय पूजा केली. मुख्यमंत्र्यासह यंदाचा पूजेचा मान वारकरी दांपत्य भाऊसाहेब काळे व मंगल भाऊसाहेब काळे यांना मिळाला. वारीमध्ये अनेक मराठी कलाकारही सहभागी होतात. तर अनेक जण आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतात.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्नीक विठ्ठलाची शासकीय महापूजा, काळे दाम्पत्य मानाचे वारकरी; पाहा Photos

मराठमोळे दिग्दर्शक व अभिनेते प्रवीण तरडे यांनी आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने खास पोस्ट शेअर केली आहे. “काही महिन्यांपूर्वी आई-वडिलांना म्हणालो, बोला तुम्हाला कुठे फिरायला जायचंय..? तुम्ही म्हणाल तिथं घेउन जातो, म्हणाल त्या देशात.. ते म्हणाले, पंढरपूरला घेऊन चल.. मी म्हणालो पंढरपूर ..? का ..? तर ते म्हणाले की पन्नास वर्षे चालत वारी करतोय, पांडुरंगाला कधी जवळून नाही पाहीलं, धक्केबुक्के खात ढकलाढकलीतच दिसलाय तो थोडा थोडा.. जरा निरखून पहायचाय..
मग एका एकादशीला शुटींग बिटींग सगळं थांबवून दोघांना घेउन गेलो पंढरपूरला.. विठ्ठलाकडे एकटक बघत बराच वेळ रडतच होते दोघं.. त्या दिवशी त्यांच्या डोळ्यात दिसलं की वारीची ही परंपरा ईतकी वर्षे का टिकून आहे.. पन्नास वर्ष चालत जातायेत तरी ट्रीपला कुठं जायचंय म्हटल्यावर त्यांना पंढरपूरच आठवलं..
वारी चाललेल्या प्रत्येक माऊलीला आषाढीच्या खुप खुप शुभेच्छा”
असं प्रवीण तरडे यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रवीण तरडेंनी त्यांच्या पोस्टबरोबर पंढरपुरातील मंदिरात काढलेले फोटोही शेअर केले आहेत. एका फोटोमध्ये प्रवीण तरडे व त्यांचे आई-वडील दिसत आहेत. तर, दुसऱ्या फोटोत त्यांचे आई-वडील विठ्ठलासमोर हात जोडून उभे आहेत.