लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी रविवारी ( ९ जून ) सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती भवन येथे झालेल्या कार्यक्रमाला देश आणि जगभरातून अनेक मान्यवर उपस्थित होते. देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी हे दुसरे व्यक्ती ठरले आहेत. यंदा मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांचाही समावेश आहे.

मुरलीधर मोहोळ यांना मिळालेल्या संधीनंतर पुण्यातील भाजपाच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष करण्यात आला. याशिवाय अभिनेते- दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी देखील खासदार मित्रासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टसह तरडेंनी मुरलीधर मोहोळ यांचा शपथ घेतानाचा फोटो देखील शेअर केला आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
Sharad Pawar On Devendra Fadnavis CM Oath Ceremony
Sharad Pawar : महायुती सरकारच्या शपथविधीला का नाही…

हेही वाचा : “त्याला फोटो बिटो आवडत नाहीत”, अवघ्या १९ व्या वर्षी झालेलं मृणाल कुलकर्णींचं लग्न, पतीसाठी लिहिली खास पोस्ट

प्रवीण तरडे यांची पोस्ट

मित्रा,
आज शब्द अपुरे पडतील पण लेखन थांबायचं नाही… कित्येकजण योगायोगानं राजकारणात येतात पण तू काहीतरी ठरवून यामध्ये आलास… राजकारणात येऊन लोक समाजकारण लोणच्यासारखं वापरतात पण, तू ते ताट भरून घेतलंस, पोटभरून रिचवलंस… कदाचित म्हणूनच करोनाच्या महामारीत तू पुण्याला वाचवलंस.

तुझ्या त्या पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली अन् पुणेकरांनी पण त्याची सव्याज परतफेड केली… तुला लाखोंच्या मताधिक्यानं दिल्ली दाखवली… दिल्लीनं तर दिलदारपणाचा कळस गाठला आणि थेट मंत्रीपदाची माळ तुझ्या गळ्यात घातली.

पण, मित्रा एवढं सगळं होऊनही असं वाटतंय ही तर फक्तं सुरुवात आहे अजुनही “परम वैभवम नेतुमेतत स्वराष्ट्रम” या दैवी संदेशापासून आपण थोडं दूरच आहोत.. येत्या पंचवीस वर्षात जितकं जमेल तितकं या दैवी संदेशाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू…

पुण्येश्वराची पुण्याई तुझ्या पाठीशी आहेच बाकी मुळशीची शान, पुण्याचा अभिमान, भारत देशाचा स्वाभिमान ठरो…

तुझं खूप अभिनंदन आणि आभाळभर शुभेच्छा!

हेही वाचा : ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांनी लग्नानंतर घेतलं हक्काचं घर, गृहप्रवेशाचे फोटो व्हायरल

दरम्यान, भाजपाचे वॉर्ड अध्यक्ष म्हणून मुरलीधर मोहोळ यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. २०१९ ते २०२२ या काळात ते पुण्याचे महापौर होते. यंदा पहिल्यांदाच ते खासदार झाले आहेत. यावर्षी मतदान केल्यावर माध्यमांशी संवाद साधताना प्रवीण तरडे मोहोळ यांच्याबद्दल म्हणाले होते की, “तो माझा मावस भाऊ आहे…नात्यागोत्यातला भाऊ असेल तर त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे माझ्या भावासाठी मी शूटिंग बंद करून मैदानात उतरलेलो त्याच्यासाठी प्रचार केला.” यानंतर आता मुरलीधर मोहोळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यावर प्रवीण तरडेंनी पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

Story img Loader