कलाविश्वात आघाडीचा अभिनेता म्हणून ओळखला जाणारा उमेश कामत आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करत आहे. आज मराठी सिनेविश्वातून उमेशवर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात येत आहे. अशातच त्याची बायको अभिनेत्री प्रिया बापटने खास रोमँटिक पोस्ट शेअर करत आपल्या लाडक्या नवऱ्याचं वाढदिवसानिमित्त कौतुक केलं आहे. प्रियाने उमेशचे Unseen फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. तसेच या सगळ्या फोटोंखाली तिने खास कॅप्शन सुद्धा लिहिलं आहे.
प्रिया लिहिते, “माझा गोड उमेश! तू माझ्या आयुष्यात असणं हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे. मला कसं चिडवायचं अन् कसं प्रेम करायचं सगळंच तुला माहीत आहे. तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आणि आयुष्यभर पुरेल एवढं प्रेम!” अभिनेत्रीने या कॅप्शनसह उमेशचे एकूण ७ फोटो शेअर केले आहेत. या सात फोटोंना तिने वेगवेगळं कॅप्शन दिलेलं आहे.
हेही वाचा : Video : याला म्हणतात माणुसकी! अंशुमन विचारेचा महागडा फोन रिक्षा चालकाने केला परत! व्हिडीओ व्हायरल
प्रियाने उमेशबरोबरच्या फोटोंना दिलं खास कॅप्शन
पहिला फोटो : आयुष्यभर असेच एकत्र राहू…
दुसरा फोटो : तुला खेळकरपणे चिडवण्याचा अन् त्रास देण्याचा आनंद मी आयुष्यभर घेत राहीन.
तिसरा फोटो : आमच्या दोघांमधला वेडेपणा असाच राहो!
चौथा फोटो : आयुष्यातील चांगल्या आणि वाईट अशा दोन्ही प्रसंगी तू मला अशीच साथ दे…
पाचवा फोटो : आपल्या आई-बाबांचे आशीर्वाद कायम तुझ्याबरोबर आहेत.
सहावा फोटो : शारिवाचा तू कायम आवडता राहशील. ( शारिवा-प्रियाच्या मोठ्या बहिणीची मुलगी)
सातवा फोटो : तुझे आई-बाबा तुझ्यावर सदैव लक्ष ठेवून आहेत आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आज तुला आयुष्यात भरभरून यश आणि प्रेम मिळालं आहे.This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
दरम्यान, प्रियाने शेअर केलेल्या या सुंदर फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. गेली २० वर्ष प्रिया-उमेश एकमेकांबरोबर आहेत. त्यामुळे मराठी कलाविश्वात या दोघांची जोडी प्रचंड लोकप्रिय आहे. सध्या दोघंही ‘जर तरची गोष्ट’ या नाटकाद्वारे प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत.