प्लॅनेट मराठीची नवीन वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘अथांग’ असं वेब सीरिजचे नाव असून याचा लॉन्चिंग सोहळा नुकताच पार पडला. या सोहळ्याला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही हजेरी लावली. या सोहळ्यात राज ठाकरेंनी मराठी चित्रपट, मनोरंजनसृष्टी याबद्दल असलेलं त्यांचं प्रेम व्यक्त केलं.

वेब सीरिजच्या या सोहळ्यात राज ठाकरेंची मुलाखतही घेण्यात आली. यावेळी राज ठाकरेंना मराठी वेब सीरिजमध्ये हिंदी संवादावरुन प्रेक्षक तक्रार करत असल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावर राज ठाकरे उत्तर देत म्हणाले “अमराठी कलाकार मराठी वेब सीरिजमध्ये येऊन मराठी बोलणार असेल, तर नक्कीच चांगली गोष्ट आहे. मराठी वेब सीरिज किंवा चित्रपटात अमराठी व्यक्ती हिंदीत बोलणार असेल, तर त्यात काहीच पॉइंट नाही. त्या एकट्या व्यक्तीमुळे सीरिज चालणार आहे, असंही नाही. कारण आपल्याकडे खूप कलाकार आहेत”.

हेही वाचा >> Drishyam 2 Box Office Collection: चौथ्या दिवशी ‘दृश्यम २’च्या कमाईत घट; जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

अमराठी प्रेक्षकांबद्दलही राज ठाकरे यांनी मत व्यक्त केलं. “अमराठी प्रेक्षकांचा विचार करुन जर हिंदीत संवाद देत असू तर मी एक सांगतो. राजकुमार हिराणीपासून माझे अनेक अमराठी मित्र आहे. या सगळ्यांना उत्तम मराठी येतं. आमच्यात संवादही मराठीतूनच होतो आणि ९० टक्के विनोदही आम्ही मराठीतूनच करतो. आपल्याला असं वाटतं की त्यांना मराठी येत नाही. पण ते मुंबईतच लहानाचे मोठे झाले आहेत. त्यामुळे त्यांना मराठी येतं. त्यामुळे या गोष्टी शक्य तितक्या आपण टाळल्या पाहिजेत”, असं ते म्हणाले.

हेही वाचा >> “मी राजकारणात अपघाताने आलो, माझं पाहिलं पॅशन…”; राज ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज ठाकरेंनी दाक्षिणात्य कलाकारांचे उदाहरण देत मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शकांचे कान टोचले आहेत. ते म्हणाले “दाक्षिणात्य कलाकारांकडून हा कडवटपणा आपण घेतला पाहिजे. त्यांच्या गोष्टींवर जसे ते ठाम राहतात, तसंच आपणही ठाम राहणं आवश्यक आहे”.