Rajeshwari Kharat : नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘फँड्री’ चित्रपट १४ फेब्रुवारी २०१४ मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाने अनेक पुरस्कार जिंकत बॉक्स ऑफिसवर सुद्धा चांगली कमाई केली होती. यामध्ये राजेश्वरी खरात आणि सोमनाथ अवघडे या नवख्या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारल्या होत्या. राजेश्वरीने साकारलेली शालू आणि सोमनाथने साकारलेला जब्या या दोन्ही पात्रांना प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. आज चित्रपट प्रदर्शित होऊन इतकी वर्षे उलटूनही जब्या-शालूची जोडी सर्वत्र सुपरहिट आहे.

राजेश्वरी आणि सोमनाथला आजही शालू-जब्या या नावांनीच ओळखलं जातं. सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून हे दोघं पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. याचं कारण म्हणजे, दोन दिवसांपूर्वी राजेश्वरीने हळद लागतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला होता. यामध्ये सोमनाथ आणि राजेश्वरी एकत्र पाटावर बाजू-बाजूला बसल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच, अभिनेत्रीच्या हातात हिरवा चुडा, दोघांच्या डोक्याला मुंडावळ्या बांधल्याचं देखील या फोटोमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र शालू-जब्याची ऑनस्क्रीन जोडी खऱ्या आयुष्यात एकत्र आल्याच्या चर्चा रंगू लागल्या.

हेही वाचा : “शाहरुखने पाकिस्तानला हे-ते दिलं, या सगळ्या थापा…”, ‘किंग खान’च्या वाढदिवशी मराठी अभिनेत्याची पोस्ट; म्हणाले…

राजेश्वरीच्या फोटोने वेधलं लक्ष, नेटकरी पडले संभ्रमात

शालू-जब्याच्या हळदीच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला होता. मात्र, या दोघांनी या फोटोला काहीच कॅप्शन दिलेलं नव्हतं. अशातच आता अभिनेत्रीने ( Rajeshwari Kharat ) आणखी फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. दोघेही या फोटोत नवीन वधू-वराच्या पोशाखात पाहायला मिळत आहेत. यामध्ये दोघांनीही डोक्याला बाशिंग बांधलं आहे. मात्र, हा नवीन फोटो पाहून नेटकरी चांगलेच संभ्रमात पडले आहेत. या फोटोवर देखील कोणतंही कॅप्शन नसल्याने “तुमचं खरंच लग्न झालंय की, शूटिंगसाठी हे करताय” असे सवाल नेटकऱ्यांनी या दोघांना कमेंट्समध्ये विचारले आहेत.

हेही वाचा : Video : दिवाळीच्या दिवशी जान्हवी किल्लेकरने सासूबाईंसाठी केलं असं काही…; नेटकरी म्हणाले, “खरी लक्ष्मी तुच आहेस…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
Rajeshwari Kharat
नेटकऱ्यांच्या कमेंट्स ( Rajeshwari Kharat )

“शूटिंग आहे मित्रांनो! लाईक Views साठी ती मुद्दाम सांगत नाहीये”, “डायरेक्टर गरीब आहे वाटतं जब्याला चप्पल पण नाही दिली नीट”, “खरंच लग्न झालंय का?”, “मित्रांनो हा Fandry 2 चा शॉट आहे ज्यात त्यांचं लग्न होणार आहे… हा सिनेमा २०२५ ला प्रदर्शित होणार आहे.”, “शूटिंगचे फोटो आहेत”, “अरे बाबा आम्हाला वेड्यात काढू नका. खरं आहे की खोटं सांगून टाका एकदा” अशा कमेंट्स नेटकऱ्यांनी या ( Rajeshwari Kharat ) फोटोवर केल्या आहेत.