Rinku Rajguru celebrate Ganpati festival: गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सगळीकडे उत्साह आणि आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारही हा सण अगदी उत्साहात साजरा करत असल्याचे सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटो आणि व्हिडीओंमधून पाहायला मिळत आहे.
स्वप्नील जोशी, शर्वरी वाघपासून अनेक इतर कलाकारांनी श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कलाकारांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करत त्यांच्या घरातील गणपतीचे फोटो, सजावट, मोदक आणि त्यांचे काही फोटो शेअर केले आहेत.
रिंकू राजगुरूच्या घरी गणपती बाप्पाचं आगमन
आता अभिनेत्री रिंकू राजगुरूने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये अभिनेत्रीच्या घरातील गणपती पाहायला मिळत आहे. रिंकूने तिच्या घरात श्री गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली आहे. तसेच बाप्पाासाठी सुंदर सजावटही केली आहे. तिथेच विठ्ठल-रुक्मिणीच्या सुंदर मूर्ती, तसेच गणपती बाप्पासमोर मोदक ठेवल्याचेदेखील पाहायला मिळत आहे. तर, एका फोटोत तिच्या मांडीवर मांजरदेखील दिसत आहे.
रिंकू यानिमित्ताने साडी नेसली आहे. पिवळ्या रंगाच्या साडीत ती अत्यंत सुंदर दिसत आहे. रिंकूचा लूक लक्ष वेधून घेत आहे. तिच्या काही फोटोंमध्ये तिने केसांत गजरा माळल्याचेदेखील पाहायला मिळत आहे.
हे फोटो शेअर करताना रिंकूने लिहिले, ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’, अशी कॅप्शन दिली आहे. रिंकूने शेअर केलेल्या या फोटोंवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत.
“गणपती बाप्पा मोरया”, “तुला गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा”, “छान आहे”, अशा कमेंट्स करीत अभिनेत्रीला शुभेच्छा दिल्या आहेत. कर काहींनी हार्ट इमोजी शेअर करत प्रेम व्यक्त केले आहे.


रिंकूच्या कामाबद्दल बोलायचे तर ती नुकतीच एका नवीन चित्रपटातून प्रेक्षकांच्या आली आहे. ही भूमिका तिच्या आधीच्या भूमिकांपासून थोडी वेगळी असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘बेटर हाफची लव स्टोरी’ असे या चित्रपटाचे नाव आहे. या चित्रपटात अभिनेते सुबोध भावे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरेदेखील प्रमुख भूमिकेत दिसत आहेत. २२ ऑगस्ट २०२५ ला हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे.