Rinku Rajguru expressed gratitude: महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळा नुकताच पार पडला. ६० आणि ६१ व्या राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती.

मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकारांचा या वेळी विविध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. लोकप्रिय अभिनेत्री रिंकू राजगुरूला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देण्यात आला. आशा या चित्रपटासाठी तिला हा पुरस्कार देण्यात आला.

आता अभिनेत्रीने सोशल मीडियावर पुरस्कार मिळाल्यानंतर काही फोटो शेअर केले आहेत. तसेच तिने कृतज्ञता व्यक्त केली आहे. अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने सुंदर साडी नेसल्याचे दिसत आहे. तिच्या हातात ट्रॉफी असून, रिंकूच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळत आहे. एका फोटोमध्ये विजेते आहेत, रिंकू राजगुरू, चित्रपट आशा, असे लिहिल्याचे दिसत आहे.

रिंकू राजगुरू काय म्हणाली?

हे फोटो शेअर करताना रिंकूने कृतज्ञता व्यक्त केली. राज्य पुरस्कार उत्कृष्ट अभिनेत्री (चित्रपट- आशा) कै. स्मिता पाटील पारितोषिक, असे त्यावर लिहिलेले आहे. तसेच दीपक पाटील आणि दैवता चव्हाण पाटील यांना टॅग करीत, रिंकूने आशा या चित्रपटासाठी तिला कास्ट केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. मी ही भूमिका निभावू शकते, यावर तुम्ही विश्वास ठेवला, त्यासाठी थँक्यू, असे तिने लिहिले आहे.

रिंकू राजगुरूच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करीत कौतुकाचा वर्षाव केला आहे. त्याबरोबरच अनेक लोकप्रिय कलाकारांनीदेखील तिचे अभिनंदन केले आहे.

अभिनेत्री मुक्ता बर्वेने अभिनंदन रिंकू, खूप प्रेम, अशी कमेंट केली आहे. त्यावर रिंकूने तिचे आभार मानले आहेत. अमृता खानविलकरने अभिनंदन, गोंडस अशा कमेंट केल्या आहेत. प्रसाद ओकनेदेखील कमेंट करीत तिचे कौतुक केले आहे. तर अभिनेता ललित प्रभाकरने खूप भारी, असे लिहिले आहे. जितेंद्र जोशी यांनीदेखील अभिनंदन, असे लिहिले आहे. सुयश टिळक, ऋतुजा बागवे यांनीदेखील अभिनंदन अशा कमेंट्स करीत रिंकूचे कौतुक केले आहे. रिंकूनेदेखील त्यांचे आभार मानल्याचे कमेंटसमध्ये दिसत आहे.

अनेक चाहत्यांनी रिंकूचे अभिनंदन करणाऱ्या कमेंट्स केल्या आहेत. “खूप खूप आणि मनापासून अभिनंदन ताई आणि पुढील वाटचालीस आपणास खूप खूप शुभेच्छा”, “अभिनंदन”, “हार्दिक अभिनंदन”, अशा अनेक कमेंट्स पाहायला मिळत आहेत.

दरम्यान, रिंकू राजगुरूने २०१६ साली सैराट या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले.