‘सैराट’ चित्रपटामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू विविधांगी भूमिका साकारताना दिसत आहे. ‘सैराट’नंतर रिंकू ‘आठवा रंग प्रेमाचा’, ‘कागर’, ‘झुंड’ आणि ‘झिम्मा २’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकली. आता लवकरच रिंकू एका नव्या चित्रपटातून नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

अभिनेत्री रिंकू राजगुरू आता सुबोध भावेबरोबर झळकणार आहे. यांच्या जोडीला अभिनेत्री प्रार्थना बेहेरे देखील असणार आहे. याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एवढंच नाहीतर रिंकू व सुबोध भावे यांनी इन्स्टाग्राम स्टोरीला चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान फोटो शेअर केले आहेत.

हेही वाचा – Video: ‘बिग बॉस ओटीटी २’ विजेत्याने रेस्टॉरंटमध्ये एकाच्या कानशिलात लगावली, व्हिडीओ व्हायरल झाल्यावर म्हणाला, “मी असाच आहे…”

या फोटोमध्ये रिंकू लाल रंगाच्या साडीमध्ये दिसत आहे. तर तिच्या बाजूला सुबोध भावे पिवळ्या रंगाचा शर्टमध्ये पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता सुबोध भावे, रिंकू राजगुरू व प्रार्थना बेहेर हे त्रिकुट कोणत्या नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार? हा चित्रपट कधी प्रदर्शित होणार? असे अनेक प्रश्न चाहत्यांना पडले आहेत.

हेही वाचा – Video: शितली-पश्याची जमणार जोडी, लवकरच प्रेक्षकांच्या येणार भेटीस, नव्या मालिकेचा जबरदस्त प्रोमो समोर

दरम्यान, रिंकूच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तिने मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतही आपल्या अभिनयाची छाप उमटवली आहे. रिंकूने ओटीटी विश्वातही पाऊल ठेवलं आहे. ‘हंड्रेड’ या वेब सीरिजमध्ये ती झळकली होती. या वेब सीरिजमध्ये रिंकूने बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ताबरोबर काम केलं आहे.

Story img Loader