‘आयफा’ हा बॉलीवूडमध्ये मानाचा मानला जाणारा पुरस्कार आहे. या पुरस्कार सोहळ्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असतं. दरवर्षी हा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न होतो. तर ‘आयफा – २०२३’ हा पुरस्कार सोहळा काल रंगला. या पुरस्कार सोहळ्याला बॉलीवूडमधील अनेक नामवंत कलाकारांनी हजेरी लावली होती. या पुरस्कार सोहळ्यात मराठीचा डंका वाजलेला दिसला. याचं कारण म्हणजे रितेश देशमुखच्या ‘वेड’ या चित्रपटाला या पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला.

‘वेड’ हा चित्रपट गेल्या वर्षाच्या अखेरीस प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या माध्यमातून रितेश देशमुखने दिग्दर्शनात पाऊल टाकलं, तर त्याची पत्नी अभिनेत्री जेनिलेया देशमुख हिने मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं. या चित्रपटाने चित्रपटगृहात उत्कृष्ट कामगिरी केली. प्रेक्षकांनी या चित्रपटाचं भरभरून कौतुक केलं. तर आता या चित्रपटाने ‘आयफा’ पुरस्कारावर आपलं नाव कोरलं आहे.

आणखी वाचा : Video: “टाळ्या, शिट्ट्यांनी तुम्ही ‘श्रावणी’चं स्वागत केलं, पण…” ‘वेड’ला मिळणारं यश पाहून जिनिलीया देशमुखने केलेली पोस्ट चर्चेत

काल परदेशात संपन्न झालेल्या ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये ‘वेड’ चित्रपटाला प्रादेशिक चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट कामगिरीसाठी पुरस्कार मिळाला. या चित्रपटाचा दिग्दर्शक रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनिलिया देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. तर यावेळी रितेश आणि जेनिलियाने परीक्षकांचे आणि प्रेक्षकांचेही आभार मानले.

हेही वाचा : “… तर आज ‘वेड’ माझ्याऐवजी ‘त्याने’ दिग्दर्शित केला असता,” रितेश देशमुखचा चित्रपटाबाबत मोठा खुलासा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तर या व्यतिरिक्त ‘आयफा’ पुरस्कार सोहळ्यात ‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटाने बाजी मारली. सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीबरोबरच या चित्रपटाला अनेक पुरस्कार मिळाले. याचबरोबर ‘ब्रह्मास्त्र’, ‘दृश्यम-२’ या चित्रपटांनीदेखील ‘आयफा’च्या ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं