रितेश देशमुख दिग्दर्शित ‘वेड’ चित्रपटाने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलं आहे. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवसापासूनच हा चित्रपट कोटींची कमाई करत आहे. ‘वेड’ चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २ कोटी २५ लाख रुपयांची कमाई केली होती. त्यानंतर पहिल्या आठवड्यात २०.६७ कोटींचा गल्ला जमवला.

या चित्रपटाने दहाव्या दिवशी रविवारी तब्बल ५.७० कोटींची कमाई केली. ही रेकॉर्डब्रेक कमाई करत ‘वेड’ने नागराज मंजुळेच्या ‘सैराट’ या चित्रपटालाही मागे टाकलं आहे. दुसऱ्या आठडव्यातही चित्रपटाची ही यशस्वी घोडदौड सुरूच आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाने पहिल्याच आठवड्याइतके म्हणजेच २०.१८ कोटी इतकी कमाई केली आहे.

आणखी वाचा : Pathaan Trailer On Burj Khalifa : शाहरुखच्या ‘पठाण’ची होतीये सगळीकडे चर्चा; बुर्ज खलिफावर झळकणार चित्रपटाचा ट्रेलर

दोन आठडव्यात मिळून या चित्रपटाने ४० कोटीचा टप्पा पार केला आहे. या चित्रपटाची हवा अशीच राहिली तर येणाऱ्या काही दिवसात हा चित्रपट ‘सैराट’चा १०० कोटीचा विक्रमही मोडीत काढेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. रितेश देशमुखने दोन आठवड्यातील कमाईची ही पोस्ट शेअर करत प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

आणखी वाचा : ‘वेड’ ठरला सर्वाधिक कमाई करणारा दुसरा मराठी चित्रपट, आतापर्यंत जमवला ‘इतक्या’ कोटींचा गल्ला

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘वेड’ हा चित्रपट आता एक ब्लॉकबस्टर ठरला असल्याचं रितेशने या पोस्टमध्ये म्हंटलं आहे. यावर त्याच्या चाहत्यांनी त्याला कॉमेंट करत “हिंदीत सहाय्यक भूमिका करण्यापेक्षा मराठीत चित्रपट काढ” अशी विनंती केली आहे. प्रेक्षकांनी या चित्रपटाला उदंड प्रतिसाद दिला आहे. रितेश देशमुखने या चित्रपटातून प्रथमच दिग्दर्शनात पदार्पण केलं आहे. शिवाय जिनीलियाचासुद्धा हा पहिलाच मराठी चित्रपट आहे.