अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख याचा वेड हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत आहे. या चित्रपटाच्या पोस्टरने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आता या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला. या चित्रपटाच्या टीझरची सर्वत्र चर्चा सुरु आहे. सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अभिनेता अक्षय कुमारही या चित्रपटाच्या टीझरच्या प्रेमात पडला आहे. त्याने रितेश देशमुखसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अक्षय कुमार हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो कायम विविध गोष्टींवर भाष्य करत असतो. अक्षय आणि रितेश हे दोघेही एकमेकांचे फार जवळचे मित्र आहेत. अक्षय कुमारने ‘वेड’ या चित्रपटाचा टीझर पाहिल्यानंतर त्याने त्याचे मराठी भाषेत कौतुक केले आहे.

अक्षयने ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. “माझा भाऊ आणि ॲक्टर आता डिरेक्टर झालाय. त्याने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या मराठी सिनेमाचा टिझर पाहिला आणि खरंच सांगतो मला वेड लागलं. तुम्हीही पहा तुम्हालाही लागेल….. वेड !”, अशा शब्दात अक्षय कुमारने रितेश देशमुखचं कौतुक केलं आहे.

अक्षयच्या या पोस्टवर रितेश आणि जिनिलिया दोघांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमचा टीझर लॉन्च केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. माझ्या प्रिय Sundi, खूप खूप प्रेम’, असे रितेशने म्हटले आहे. तर जिनिलियाने ‘पाठिंब्याबद्दल खूप खूप धन्यवाद’ अशी कमेंट केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान या टीझरमध्ये रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख हे दोघेही मुख्य भूमिकेत पाहायला मिळत आहे. ‘वेड’च्या टीझरच्या सुरुवातीला रितेश देशमुख प्रेमाबद्दल बोलताना दिसत आहे. त्यानंतर जोरदार कोसळणाऱ्या पावसात फायटिंग करत असलेल्या रितेशच्या चेहऱ्यावर काहीसे रागाचे आणि व्याकूळ भाव आहेत. अशातच त्याच जिनिलियाची एंट्री होते. सिगारेटचे झुरके घेत भर पावसात जिनिलियासमोरून जाणारा रितेश सर्वांची उत्कंठा वाढवतो. याशिवाय या टीझरमध्ये रितेशचा “प्रेम असतं प्रेमासारखंच, काही वेड्यासारखं प्रेम करतात तर काही प्रेमातलं वेड होतात” हा संवाद मनाचा ठाव घेतो.