‘गोलमाल’, ‘सिंघम’सारख्या सुपरहिट चित्रपटांचा दिग्दर्शक रोहित शेट्टीचं मराठीवरील प्रेम जगजाहीर आहे. तो मराठी कलाकारांना आवर्जून त्याच्या चित्रपटात घेतो. तसेच महाराष्ट्रावरही त्याचं खूप प्रेम आहे. अनेकदा तो याबद्दल बोलत असतो. हिंदीमध्ये दमदार कमाई करणारे चित्रपट बनवल्यानंतर आता रोहित शेट्टीची निर्मिती असलेला महिला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

आवडता मराठी चित्रपट कोणता? रोहित शेट्टी म्हणाला, “मला निळू फुलेंचा…”

रोहितचा ‘स्कूल, कॉलेज आणि लाइफ’ हा चित्रपट लवकरच सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दरम्यान, रोहित शेट्टीचं मराठीशी खास कनेक्शन आहे आणि त्याला आधीपासूनच मराठी चित्रपटही आवडतात. रोहितचा आवडता मराठी चित्रपट निळू फुलेंचा ‘पिंजरा’ हा आहे. अशातच आता त्याला आवडता मराठी अभिनेता कोण आहे? याबद्दल त्याला विचारण्यात आलं.

“उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे…” रोहित शेट्टीने सांगितलेलं मराठी कलाकारांना चित्रपटांत घेण्यामागचं कारण

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रोहित शेट्टीने उत्तर देत आपला आवडता मराठी अभिनेता कोण आहे हे सांगितलं. “मला अशोक मामा म्हणजेच अभिनेते अशोक सराफ यांचा अभिनय आवडतो”, असं तो म्हणाला. दरम्यान, रोहितच्या चित्रपटात अनेकदा मराठी कलाकार झळकतात. विजय पाटकर, वरुण शर्मा, अश्विनी काळसेकर, सिद्धार्थ जाधव आणि खुद्द अशोक सराफ यांनीही रोहितच्या चित्रपटांमध्ये काम केलंय.