‘बिग बॉस मराठी’ या कार्यक्रमामुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरांत लोकप्रिय झाली. आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. रुपेरी पडद्यावर काम केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात तिने २०२० मध्ये तीर्थदीप रॉयसह लग्न केलं. लग्नाच्या ३ वर्षांनंतर सईने डिसेंबर २०२३ मध्ये एका गोड मुलीला जन्म दिला. गरोदरपणात तिचं वजन काहीसं वाढलं त्यामुळे सध्या सई शेअर करत असलेल्या पोस्टवर तिला वजन कमी करण्याचे सल्ले देऊन नेटकरी ट्रोल करत आहेत. यावर आता पोस्ट शेअर करत अभिनेत्रीने संताप व्यक्त केला आहे.

सई लोकूरला १७ डिसेंबरला कन्यारत्न प्राप्त झाले. आई झाल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला. परंतु, काही लोकांनी वाढलेल्या वजनावरून तिला ट्रोल केलं. यासंदर्भात आता सईने पोस्ट शेअर केली आहे. अभिनेत्री लिहिते, “लोकांना जाड आणि बारीक यापलीकडे काहीच दिसत नाही का? महिलांना गरोदरपणानंतर साधारणत: ६ महिने रजा मिळते. या सहा महिन्यांत बायका बाळाचं संगोपन करतात आणि त्यानंतर पुन्हा कामाला सुरुवात करतात.”

हेही वाचा : Video : “मला गॅरंटी नव्हती, ण…”, कॅन्सरवर मात करून अतुल परचुरेंनी केलं कमबॅक; सर्वच कलाकारांचे डोळे पाणावले

sai lokur
सई लोकूरची पोस्ट

“मी आई झाल्यावर अवघ्या ३ महिन्यांतच पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. उत्पादनांचा प्रचार आणि विविध जाहिरातींसाठी मी शूटिंग करते. एका आईला कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी माझ्या वाढलेल्या शरीराबाबत कमेंट्स करत तुम्ही सतत ट्रोल करत आहात. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आपण कोणत्या प्रकारच्या मानसिकतेत राहत आहोत? एकमेकांना पुढे घेऊन जाण्याऐवजी आपण एखाद्याला खाली खेचत आहोत.” अशी संतप्त पोस्ट सई लोकूरने शेअर केली आहे.

हेही वाचा : पाच बहिणी अन् एक भाऊ, आई महाराष्ट्रीय तर वडील…; प्रसिद्ध अभिनेत्रीने कुटुंबाबद्दल दिली माहिती

sai
सई लोकूरची पोस्ट

दरम्यान, सई लोकूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर आजवर तिने अनेक मराठी व हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’, ‘किस किसको प्यार करू’, ‘जरब’, ‘मी आणि यू’ अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केलं आहे.