महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत बहुमताने महायुतीचा विजय झाला आणि अखेर सत्ता स्थापन झाली. ५ डिसेंबरला आझाद मैदानावर देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी खास पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक दिग्गज मंडळींनी उपस्थिती लावली होती. यानिमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक, संगीतकार, गीतकार आणि दिग्दर्शक सलील कुलकर्णींनी सोशल मीडियावर खास पोस्ट लिहिली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

सलील कुलकर्णींनी एक जुना फोटो शेअर करत पोस्ट लिहिली आहे. या फोटोमध्ये त्यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुरलीधर मोहोळ पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर त्यांनी लिहिलं आहे की, माननीय देवेंद्रपंत…मनःपूर्वक अभिनंदन…दहा वर्षांपूर्वी…म्हणजे २०१४ मध्ये परममित्र मुरलीअण्णांनी आयोजित केलेल्या कोथरूड महोत्सवात मिळालेल्या पुरस्काराच्या निमित्ताने झालेली ही देवेंद्रजी फडणवीस यांची झालेली पहिली निवांत भेट…त्याचा हा फोटो…गुरू जयमालाबाई आणि कीर्ती शिलेदार यांच्या उपस्थितीत मिळालेला हा पुरस्कार.

हेही वाचा – ‘या’ दोन लोकप्रिय मराठी मालिका लवकरच होणार बंद; एक तर पाच महिन्यांपूर्वीच झालेली सुरू

पुढे सलील कुलकर्णींनी लिहिलं, “ही भेट देवेंद्रजीनाही अजून लक्षात आहे ही या माणसाची कमाल आहे…या माणसाकडे काहीतरी वेगळीच शांतता आहे…समाज माध्यमावर झालेली टीका…कुटुंबीयांची झालेली चेष्टा…या माणसाने ज्या पद्धतीने हाताळली…ही गोष्ट स्पृहणीय आहे. या फोटोत एकीकडे तेव्हाचे नगरसेवक आणि आताचे केंद्रीय मंत्री आणि खासदार मुरलीअण्णा मोहोळ आहेत आणि एकीकडे तेव्हाचे युवा प्रदेशाध्यक्ष आणि आत्ताचे मुख्यमंत्री देवेंद्रजी आहेत.”

“दोघांनीही निष्ठा आणि कष्ट यातून मिळवलेलं यश अभिमानास्पद आहे…आणि त्यांच्याशी आपण सहज बोलू शकतो, आपलं म्हणणं मांडू शकतो अशी ही दोन माणसं…एखाद्याने स्वप्न पाहावे आणि पूर्ण करावे तर असे…’मी पुन्हा येणार’ म्हणणारा माणूस…पुन्हा आला…तो सुद्धा दिमाखात…सगळ्या साथीदारांना बरोबर घेऊन…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांचे मनःपूर्वक अभिनंदन…माननीय एकनाथ शिंदे आणि अजितदादा यांचेही मनापासून अभिनंदन,” अशी पोस्ट सलील कुलकर्णींनी लिहिली आहे.

हेही वाचा – ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेसाठी अशोक सराफांनी निवेदिता यांना दिला होता ‘हा’ सल्ला; काय म्हणाले? वाचा…

हेही वाचा – “तुमच्यामधील केमिस्ट्री…”, ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत!’ मालिकेबद्दल लीना भागवत यांची प्रतिक्रिया, म्हणाल्या…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सलील कुलकर्णींच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहे. “महाराष्ट्राच्या राजकारणातील आर्य चाणक्य म्हणजेच देवेंद्र फडणवीस”, “देवेंद्र फडणवीसांच्या सहनशक्तीची खरंच कमाल आहे”, अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांच्या उमटल्या आहेत.