अभिनेत्री सायली संजीव ही सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे तसंच तिच्या कामामुळे प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटातून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. ती सध्या या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसते. पण या चित्रपटाच्या प्रक्रियेदरम्यान एका क्षणी सायलीचे भान हरपले आणि तिने अशी एक कृती केली ज्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं.

गायत्री चित्रे हिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सायली संजीवला टॅग करत तिच्यासाठी एक पोस्ट लिहिली. त्यात तिने हा किस्सा सांगितला आहे. तिने लिहीलं, “१७ ऑगस्ट २०१९…ओबेरॉय मॉल (गोरेगाव), सीसीडी…आणि याच दिवशी आम्हाला आमची इंद्रायणी सापडली होती.. सायलीचं पहिलं “गोष्ट एका पैठणीची” च फिल्म नरेशन. शंतनू आणि मी सायलीला गोष्ट ऐकूयात म्हणून भेटलो. शंतनू इतक्या सुंदरप्रकारे गोष्ट सांगतो की समोरचा माणूस अगदी मन लावून ती गोष्ट ऐकत राहतो. सायलीचं ही तसंच झालं.”

आणखी वाचा : …म्हणून विकी-कतरिनाने लग्नसोहळ्यात मोजक्याच बॉलिवूड स्टार्सना केलं होतं निमंत्रित

पुढे तिने लिहीलं, “सायली एवढी गुंग झाली होती की गोष्ट ऐकता ऐकता आपण कॉफी शॉपमध्ये खुर्चीवर मांडी घालून स्टोरी ऐकण्यात रमलोय हे भानच तिला राहिलं नाही. हा फोटो जितका सायली साठी खास आहे त्याहून जास्त माझ्या मनाच्या जवळचा आहे. कारण इथूनचं न विसरता येणारा माझा आणि सायलीचा पैठणीचा प्रवास सुरु झाला…”

हेही वाचा : “कोणालाही कळू न देता मी…” अखेर सायली संजीवने उघड केलं गुपित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गोष्ट एका पैठणीची’ हा चित्रपट २ डिसेंबर २०२२ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, मृणाल कुलकर्णी, मिलिंद गुणाजी, शशांक केतकर, सुहिता थत्ते, मधुरा वेलणकर, गिरीजा ओक, आदिती द्रविड यांच्या प्रमुख भूमिका आहेत.