Sharad Ponkshe Praised Indian Army: शरद पोंक्षे हे मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेते आहे. त्यांच्या अनेक भूमिकांना प्रेक्षकांचे मोठे प्रेम मिळाले आहे. त्यांच्या ‘पुरूष’ या नाटकाची चांगलीच चर्चा झाल्याचेदेखील पाहायला मिळाले. नुकताच त्यांचा ‘बंजारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

‘बंजारा’ या चित्रपटात शरद पोंक्षे यांच्याबरोबरच सुनील बर्वे, भरत जाधव प्रमुख भूमिकांत आहे. आता या सगळ्यात शरद पोंक्षे यांनी एका मुलाखतीत भारतीय जवानांमुळे जीव वाचला, असे वक्तव्य केले आहे. शरद पोंक्षे नेमकं काय म्हणाले, हे जाणून घेऊ..

आम्ही २५ किलोमीटरचा डोंगर…

शरद पोंक्षे यांनी काही दिवसांपूर्वीच नवशक्तीला मुलाखत दिली. या मुलाखतीत शरद पोंक्षे यांनी बंजारा चित्रपटाच्या शूटिंगचा एक किस्सा सांगितला. अभिनेते म्हणाले, “शूटिंग करताना आम्ही परवानगी काढली होती. एका दिवशी आमचं शूटिंग संपत आलं होतं. त्यावेळी अचानक बर्फाचा पाऊस सुरू झाला. डोळ्यादेखत एका तासात बर्फाचा मोठा थर जमला. स्नेहची टीम एका गाडीतून पुढे निघून गेली. ७-८ गाड्या आणि मी तिथे फसलो. त्या बर्षात ते टायर फिरायला लागले.”

“संध्याकाळचे आठ-साडे आठ वाजले होते. तर तिकडे आता काय करायचं, असा प्रश्न पडला होता. खूप थंडी होती.चारही बाजूला फक्त बर्फ होता. मला एका ठिकाणी थोडा उजेड आणि शेड दिसला. मी तिथे गेलो, मला तिथे कोणीच दिसलं नाही. मी खिडकीतून बघितलं, तर दोन जवान जेवत होते. मी दरवाजा वाजवला. त्यांनी दार उघडलं. त्यातील एक मराठी होता. मी शरद पोंक्षे असं नाव सांगितलं. त्याने मला ओळखलं. काय झालं, असं विचारलं.”

“मी त्यांना सांगितलं की ६० माणसं घेऊन अडकलो आहे. ते म्हणाले की सकाळी १० शिवाय तुम्ही इथून बाहेर पडू शकत नाही. सरकारची स्नो कटर ही गाडी इथून फिरली की तुम्हाला जाता येईल. नाहीतर, तुमच्या गाडीच्या प्रत्येक टायरला लोखंडी साखळी लावावी लागेल. तितक्या गाड्यांना साखळी कुठून आणणार?”

“त्यानंतर त्यांनी आम्हाला रात्रभर राहण्यास जागा दिली. १० वाजता सगळे लाइट बंद होतात, असं सांगितलं. कोणी जेवलं नव्हतं, उपाशी होतो. त्यांच्याकडेही खायला काही नव्हती. आम्ही कुडकुडत अख्खी रात्र काढली. पहाटे चार वाजता ते आले. त्यांनी सांगितलं की आता तुम्हाला बाहेर पडावं लागेल. स्नोकटरची गाडी १० वाजता येणार होती. मग मी सगळ्यांना विचारलं की चालत निघूया का? मग आम्ही २५ किलोमीटरचा डोंगर चालत उतरलो.”

नशिबाने कोणाला काही झालं नाही. अशी ती एक भीषण रात्र होती. सगळ्या लष्कराच्या जवानांना सलाम आहे. त्यांनी आम्हाला खूप मदत केली. ते ग्रेट आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत”, असे म्हणत शरद पोंक्षे यांनी त्यांचा अनुभव सांगितला तसेच