मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे प्रसाद ओक. सध्या त्याचे काही चित्रपट प्रदर्शनाच्या रांगेत आहे तर काही चित्रपटांचे चित्रीकरण सुरू आहे. यामधील एक चित्रपट म्हणजे ‘महापरिनिर्वाण’. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणावर आधारित हा चित्रपट आहे. प्रसाद ओकनं या आगामी चित्रपटाबाबत एक मोठी अपडेट दिली आहे.
हेही वाचा – ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्रीचा गश्मीर महाजनी आहे क्रश; म्हणाली…
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीदिनाला ‘महापरिनिर्वाण दिन’ असं म्हटलं जातं. ६ डिसेंबर १९५६ रोजी दिल्लीतील बाबासाहेब आंबेडकरांच्या निवासस्थानी त्यांचं निर्वाण झालं. त्यांच्या निधनाने सर्वांना मोठा धक्का बसला होता. संपूर्ण विश्वाचा श्वास रोखून धरणारा हा ऐतिहासिक क्षण होता. या क्षणावर आधारित ‘महापरिनिर्वाण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
हेही वाचा – “…अशी बायको सगळ्यांना मिळो” अभिनेता स्वप्नील जोशी ‘ती’ पोस्ट चर्चेत, म्हणाला…
या चित्रपटाचा आज मुहूर्त संपन्न झाला. याचा व्हिडीओ प्रसाद ओकनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने लिहीलं आहे की, “वंदनीय बाबासाहेबांचा आशीर्वाद घेऊन आज मुहूर्त संपन्न झाला… उद्यापासून चित्रीकरण सुरू…आपल्या शुभेच्छा आणि प्रेम पाठीशी असू द्या…”
हेही वाचा – “जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…
हेही वाचा – Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक
प्रसाद ओकच्या या पोस्टवर कलाकारांसह त्याच्या चाहत्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अभिनेता स्वप्नील जोशी, उत्कर्ष शिंदे, सिद्धार्थ जाधव, आदिनाथ कोठारे या कलाकारांनी प्रसादला शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, ‘महापरिनिर्वाण’ चित्रपटात प्रसाद ओकबरोबर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम गौरव मोरे झळकणार आहेत. पण दोघं कोणत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहेत, हे येत्या काळात समजेल.