scorecardresearch

Premium

“जिच्या पायाला मी स्पर्श करून…” उत्कर्ष शिंदेची अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी खास पोस्ट, म्हणाला…

बिग बॉस फेम गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

Bigg boss marathi fame Utkarsh Shinde
बिग बॉस फेम गायक, अभिनेता उत्कर्ष शिंदेच्या पोस्टनं वेधलं लक्ष

बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या पर्वात झळकलेला उत्कर्ष शिंदे सोशल मीडियावर खूप सक्रिय असतो. जिममधले व्हिडीओ, फोटो असं बरंच काही शेअर करत असतो. बिग बॉसनंतर तो अभिनय क्षेत्राकडे वळला आहे. मालिका, चित्रपटांमध्ये उत्कर्ष काम करत आहे. नुकतीच त्यानं अभिनेत्री हर्षदा खानविलकरसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे; जी चांगलीच चर्चेत आली आहे.

हेही वाचा – Video: कुशल बद्रिकेच्या गाडीत भररात्री रंगली शेरो-शायरीची बैठक, व्हिडीओ शेअर करत म्हणाला, “भाऊ कदम…”

Pooja Sawant Siddhesh Chavan Wedding Photos Out
पिवळी नऊवारी, सातफेरे अन्…; पूजा सावंतच्या लग्नाचा मराठमोळा थाट, अभिनेत्रीने शेअर केले विवाहसोहळ्यातील खास क्षण
Suhani Bhatnagar
‘डरमॅटोमायोसायटिस’ आजार आहे तरी काय? ज्यामुळे ‘दंगल’गर्ल सुहानी भटनागरचे निधन
Pulkit Samrat-Kriti Kharbanda
पुलकित सम्राट-क्रिती खरबंदा ‘या’ दिवशी बांधणार लग्नगाठ? अभिनेत्रीच्या ‘त्या’ पोस्टने चर्चांना उधाण
actress was in love with ravindra mahajani
लोकप्रिय अभिनेत्रीला रवींद्र महाजनींशी करायचं होतं लग्न, त्यांच्या पत्नी खुलासा करत म्हणाल्या, “तिने गाडीतून उडी मारली अन्…”

उत्कर्षनं हर्षदा खानविलकरबरोबरचे काही फोटो शेअर करत लिहीलं आहे की,” ‘ताईत आई दिसते.’ कलर्स चॅनेलवरील “ढोलकीच्या तालावर”च्या शूटिंगसाठी जिम वर्कआऊट आटोपून निघणारच होतो आणि भेट झाली ती माझ्या आवडत्या व्यक्तीची आईसारख्या ताईची. हर्षदा खानविलकर माझी तोंडभरून स्तुती करणारी. बिग बॉसपासून ते आता तुझी ग्रोथ पाहून, तुझा हा ग्राफ, कॉन्फिडेंस पाहून खूप छान वाटत म्हणतं कौतुकाचा वर्षाव करणारी माझी ताई.”

हेही वाचा – Video: “माय आता भेटत नाही…”; आई सीमा देव यांच्या आठवणीत अजिंक्य देव भावुक

पुढे उत्कर्षनं लिहीलं आहे की, “कधी ही कुठेही दिसली मग भले ते पेट्रोल पंप असो, कार्यक्रम असो, की जिम. तिला पाहताच नमन कराव वाटत, जिच्या पायाला मी स्पर्श करून नमस्कार केल्या केल्या जी मनभरून आशीर्वाद देते. जिच्यात ‘आभाळमाया’ दिसते. मला अभिनय क्षेत्रात मार्गदर्शन करताना ‘पुढचं पाऊल’ कसं टाकाव? ‘कळत-नकळत” येणारे ‘ऊनपाऊस’ कसे हसत पार करावे याचे मार्गदर्शन करणारी. वेगळीच ऊर्जा, सकारात्मकता, मला नेहमी जिच्यात दिसते. तिला पाहिलं की, मला माझ्या आई विजया आनंद शिंदेची आठवण येते ती माझी आवडती अभिनेत्री हर्षदा खानविलकर ताई. ताई भेटली आणि बऱ्याच गोष्टींचं थोडक्यात मार्गदर्शन करत माझ्यात नवा जोश, नवी ऊर्जा भरून गेली. मग काय, मी पण ताईचा आशीर्वाद घेऊन, तिच्यातली सकारात्मक ऊर्जा घेऊन माझं ‘ढोलकीच्या तालावर’च डान्सिंग अ‍ॅक्टच शूटिंग दणक्यात करून आलो.”

हेही वाचा – “बुरखा घालायला हवा होता?” अभिनेत्री रुचिरा जाधव ट्रोल करणाऱ्यावर भडकली, नेमकं काय घडलं?

हेही वाचा – Video: कोणती अभिनेत्री तयार व्हायला सर्वात जास्त वेळ लावते? अशोक सराफ म्हणाले…

दरम्यान, उत्कर्षच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तो बिग बॉस मराठीमुळे अधिक प्रकाश झोतात आला. आता तो लवकरच लोकप्रिय दिग्दर्शक महेश मांजरेकरांच्या ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. वीर सूर्याजी दांडकर यांच्या भूमिकेत उत्कर्ष दिसणार आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bigg boss marathi fame utkarsh shinde post for actress harshada khanvilkar pps

First published on: 12-09-2023 at 14:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×