श्रेयस तळपदेने हिंदीसह मराठीमध्येही उत्तमोत्तम काम करत प्रेक्षकांची मनं जिंकली. त्याची ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका तर प्रचंड गाजली. कलाक्षेत्रामध्ये स्वतः अधिकाधिक मेहनत करत त्याने यशाचं शिखर गाठलं. मात्र त्याचा इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. त्याला यासाठी अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. अभिनयक्षेत्रात यश मिळत नसताना त्याच्या आईने त्याला चक्का नोकरी करण्याचा सल्ला दिला होता.

झी मराठी वाहिनीवरील ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमामध्ये श्रेयस तळपदे हजेरी लावणार आहे. अवधूत गुप्तेच्या या शोचं हे तिसरं सीझन आहे. या शोच्या दुसऱ्या भागात श्रेयस उपस्थित राहिल. या दुसऱ्या भागाचे प्रोमो झी मराठी वाहिनीने त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केले आहेत. तसेत श्रेयस या कार्यक्रमात अनेक गोष्टींबाबत भाष्य करणार आहे.

आणखी वाचा – चार चित्रपट करुनही काम मिळेना, शेवटी नोकरी केली पण…; ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील प्रसिद्ध अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “माझा पगार…”

या शोमध्ये श्रेयसचा जवळचा मित्र अभिनेता जितेंद्र जोशीला व्हिडीओ कॉल लावण्यात येणार आहे. याचा प्रोमो समोर आला आहे. या प्रोमोमध्ये जितेंद्र श्रेयसच्या प्रवासाबाबत बोलताना दिसतो. जितेंद्र म्हणतो, “श्रेयस अनेक गोष्टी आहेत. मनामध्ये अनेक भावना आहेत. माझ्याकडे जेव्हा काम नव्हतं तेव्हा आपला मित्र सतिश राजवाडे याच्याकडे मला कामासाठी घेऊन जाणारा तूच होतास”.

आणखी वाचा – “वडिलांना हे क्षेत्र मान्य नव्हतं आणि…” ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्रीची पोस्ट, म्हणाली, “आमच्या तीन भावडांपैकी…”

View this post on Instagram

A post shared by Shreyas Talpade (@shreyastalpade27)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मला एक किस्सा अजूनही खूप ठळकपणे आठवतो. तुझ्या आईने तुला सांगितलं होतं की, आता कुठेतरी नोकरी वगैरे बघ. नाटकामधून काही होत नाही. तेव्हा आपण दोघं स्वामी समर्थ यांच्या मठामध्ये गेलो. तिथे दोघांनी मिळून प्रार्थना केली. त्यानंतर जे झालं ते सगळ्या महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने पाहिलं. तुला खूप खूप शुभेच्छा. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मला तू खूप आवडतोस”. जितेंद्र बोलत असताना श्रेयसला रडू कोसळलं.