scorecardresearch

Video : अशोक सराफ यांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केलेला शर्ट श्रेयस तळपदेनेही घातला अन्…; अभिनेत्याने शेअर केला ‘त्या’ सीनचा व्हिडीओ

श्रेयस तळपदे व अशोक सराफ यांनी दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांसाठी एकच शर्ट परिधान केला होता. पाहा हा खास व्हिडीओ.

Shreyas Talpade Marathi Actor
श्रेयस तळपदे व अशोक सराफ यांनी दोन वेगवेगळ्या मराठी चित्रपटांसाठी एकच शर्ट परिधान केला होता. पाहा हा खास व्हिडीओ.

अभिनेता श्रेयस तळपदे सध्या ‘तू तेव्हा तशी’ मालिकेमुळे चर्चेत आहे. श्रेयसने आजवर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. मराठीमध्ये त्याने केलेलं काम तर उल्लेखनीय आहे. श्रेयसचा ‘पछाडलेला’ चित्रपट आजही तुम्हाला आठवत असेल. श्रेयसने या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अभिनेते महेश कोठारे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. आता श्रेयसने या चित्रपटासंदर्भातीलच एक व्हिडीओ शेअर केला आहे.

आणखी वाचा – Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल

२००४मध्ये ‘पछाडलेला’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये श्रेयससह भरत जाधव, वंदना गुप्ते यांसारखे मराठीमधील टॉपच्या कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. पण तुम्हाला माहित आहे का? अशोक सराफ यांच्या ‘धुमधडाका’ चित्रपटाशी या चित्रपटाचं खास नातं आहे. श्रेयसने एक व्हिडीओ शेअर करत याबाबत माहिती दिली.

श्रेयसने दोन्ही चित्रपटांमधील एक सीन शेअर करत म्हटलं की, “हा सीन २००४साली प्रदर्शित झालेल्या ‘पछाडलेला’ चित्रपटामधील आहे. महेश कोठारे सरांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांनीच १९८०मध्ये ‘धुमधडाका’ नावाचा आणखी एक सुपरहिट चित्रपट दिग्दर्शित केला.”

आणखी वाचा – आयसीयूमध्ये असल्याचं सांगितलं, संधीचा गैरफायदा, शिव्या शिकवता अन्…; टीना व शालीनच्या पालकांचे सुंबूलच्या वडिलांवर आरोप

“ही सीन आज शेअर करायचं एवढंच कारण की या चित्रपटामध्ये मी परिधान केलेला शर्ट अशोक सराफ सरांनी ‘धुमधडाका’मध्ये परिधान केला होता. खोटं वाटतंय तर तुम्हीच बघा. मला खात्री आहे की, महेश सरांनी हा शर्ट अजूनही जपून ठेवलेला असेल. कारण ते फक्त वस्तूच नाही तर नातीसुद्धा तितकीच जपून ठेवतात.” याचबरोबर श्रेयसने महेश कोठारे यांचे आभारही मानले. या व्हिडीओमध्ये श्रेयस व अशोक सराफ यांनी एकच शर्ट परिधान केला असल्याचं दिसत आहे.

मराठीतील सर्व मराठी सिनेमा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-11-2022 at 12:33 IST

संबंधित बातम्या