‘वादळवाट’, ‘अवंतिका’, ‘अवघाची संसार’ या मालिकांमुळे अभिनेत्री श्वेता शिंदे घराघरांत लोकप्रिय झाली. नाटक, मालिका, चित्रपट अशा तिन्ही क्षेत्रांमध्ये अभिनेत्रीने आपला ठसा उमटवला आहे. अभिनयात जम बसल्यावर श्वेता पुढे निर्मिती क्षेत्राकडे वळली. ‘लागिरं झालं जी’, ‘देवमाणूस’, ‘मिसेस मुख्यमंत्री’ अशा गाजलेल्या मालिकांची निर्मिती तिने केली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत श्वेताने तिचं बालपण, कॉलेज, अभिनेत्री ते निर्माती असा संपूर्ण प्रवास उलगडला आहे.

साताऱ्याहून उच्च शिक्षणासाठी श्वेता मुंबईत आली. मिठीबाई कॉलेजमधून तिच्या अभिनय क्षेत्रातील प्रवासाला सुरुवात झाली. इंडस्ट्रीत कोणाचंही पाठबळ नसताना मेहनत करून श्वेताने एवढा मोठा यशाचा पल्ला गाठला. यादरम्यान इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवांविषयी तिने नुकत्याच महाएमटीबीला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं आहे.

हेही वाचा : ‘ठरलं तर मग’ मालिका महाराष्ट्रात पुन्हा नंबर १! टीआरपीत मारली बाजी, सायली-अर्जुनने शेअर केली खास पोस्ट

श्वेता म्हणाली, “मला या इंडस्ट्रीत अनेक लोकांकडून विविध गोष्टी शिकता आल्या. मी एका नाटकात अशोक सराफ यांच्याबरोबर काम करत होते. मला त्यांच्याबरोबर काम करून अनेक गोष्टी शिकता आल्या. जसं की, तुमच्याकडे केवळ टॅलेंट असून उपयोग नाही. तुमच्या टॅलेंटला मेहनत आणि शिस्त याची जोड असणं गरजेचं आहे.”

हेही वाचा : “सहा महिन्यांपूर्वी आई सोडून गेली…”, ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण लग्नात झालेली भावुक, सौरभबरोबरच्या नात्याबद्दल म्हणाली…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“मी सेटवर नेहमीच वेळेवर पोहोचते. पण अशोक सराफ यांच्याबरोबर काम करून मी नेहमी वेळेच्या ५ मिनिटं आधी कामावर कसं पोहोचायचं, पाच मिनिटंही उशिरा जायचं नाही या गोष्टी शिकले. चारच्या तालमीला ते बरोबर चारला पाच मिनिटं कमी असताना यायचे. पण, कधीही त्यांना उशीर झाला नाही. मुंबईत वाहतूक कोंडी असणारच आहे त्यामुळे तुम्ही नेहमी ते गृहित धरूनच आपल्या कामाचं नियोजन केलं पाहिजे असं ते कायम सांगतात.” असं श्वेता शिंदेने सांगितलं.