Mitali Mayekar & Siddharth Chandekar : मालिका व चित्रपटांमधून घराघरांत लोकप्रिय झालेला मराठी कलाविश्वाचा ‘चॉकलेट बॉय’ म्हणून सिद्धार्थ चांदेकरला ओळखलं जातं. १४ जूनला सिद्धार्थने पत्नी मिताली मयेकर आणि जवळच्या मित्रमंडळींसह त्याचा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्याचा जन्म पुण्यात झाला आहे. चित्रपटसृष्टीत यश मिळवल्यावर वैयक्तिक आयुष्यात सिद्धार्थने अभिनेत्री मिताली मयेकरशी लग्न केलं. आपल्या लाडक्या नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीने खास पोस्ट शेअर करत सिद्धार्थला शुभेच्छा दिल्या आहेत.

सिद्धार्थचा वाढदिवस १४ जूनला असतो पण, मितालीने त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारी भावनिक पोस्ट दोन दिवसांनी शेअर केली आहे. याचं कारण म्हणजे, सिद्धार्थ-मिताली वाढदिवसाचं सेलिब्रेशन करण्यासाठी बाहेर गेले होते. या जोडी सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. त्यांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. मिताली वाढदिवसानिमित्त सिद्धार्थबद्दल काय म्हणालीये जाणून घेऊयात…

मितालीची पती सिद्धार्थ चांदेकरसाठी खास पोस्ट

वाढदिवसाच्या शुभेच्छा My Love…

आपल्या आयुष्यातील आनंद, वेडेपणा, रात्री उशिरा झालेल्या गप्पा, आपल्या अनप्लॅन्ड ट्रिप्स, घरातील शांतता… अशा माझ्या आयुष्यातील प्रत्येक क्षणांमध्ये तू असतोस.

तू फक्त माझा नवरा नाहीयेस… तर माझा जोडीदार, माझा मित्र… सर्वकाही तू आहेस आणि तुझ्याबरोबर असेन तरच संपूर्ण जीवन अर्थपूर्ण आहे.

आपल्या आयुष्यात असे काही दिवस असतात जेव्हा आपण एकमेकांबरोबर पोट दुखेपर्यंत हसतो, तर काही दिवस शांततेत घालवतो कारण, तेव्हा संवाद साधण्यासाठी शब्द पुरेसे नसतात. प्रामाणिकपणे सांगायचं झालं, तू माझ्या आयुष्यातील सुंदर क्षणही पाहिले आहेस आणि मला अगदी गोंधळलेल्या स्थितीतही पाहिलं आहेस. महत्त्वाचं म्हणजे, परिस्थिती कशीही असो तू कायम माझ्यावर तेवढंच प्रेम केलं आहेस…

तुझ्या वाढदिवशी मी फक्त तुझे आभार मानू इच्छिते…तू माझ्या आयुष्यातील सगळ्यात सेफ जागा आहेस. नेहमीच अत्यंत प्रेमळ अन् खंबीरपणे तू माझ्या पाठिशी उभा राहतोस…अजून काय हवं.

आपल्या आयुष्यातील सगळी स्वप्नं पूर्ण होवोत, आपल्याला नेहमीच रात्री उशिरा काहीतरी वेगवेगळं खायची इच्छा होवो…, अनावश्यक भांडणं करून, कॉफी शेअर करून आपण असेच कायम एकत्र राहुयात…आय लव्ह यू… हे प्रेम मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही. Happy birthday maa…. ( उशिरा पोस्ट शेअर केली कारण आम्ही वाढदिवस सेलिब्रेट करण्यात व्यग्र होतो… )

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, मितालीच्या पोस्टवर सिद्धार्थने “मंकी” अशी कमेंट करत तिला रिप्लाय दिला आहे. याशिवाय मराठी कलाविश्वातील कलाकार व सिद्धार्थ-मितालीच्या चाहत्यांनी सुद्धा अभिनेत्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.