सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर यांची जोडी मराठी कलाविश्वात प्रचंड लोकप्रिय आहे. दोघांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर २०२१ मध्ये लग्नगाठ बांधली. सध्या सिद्धार्थ त्याच्या ‘झिम्मा २’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यात अभिनेत्याने कलाकृती मीडियाशी संवाद साधला आणि वैयक्तिक आयुष्याबाबत अनेक खुलासे केले.

चित्रपट, मालिका, सीरिज अशा तिन्ही माध्यमांमध्ये सिद्धार्थने त्याच्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. अभिनेता सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सिद्धार्थच्या परदेशातील सहलींचे, हटके फॅशन स्टाईलचे आणि बायको मितालीबरोबरचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यामुळे सिद्धार्थ-मितालीच्या चाहत्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायची इच्छा असते. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सिद्धार्थने त्याच्या बायकोचा म्हणजेच मितालीचा फोन नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहे? याबद्दल खुलासा केला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : सुभेदारांच्या घरात होणार सायलीच्या मधूभाऊंची एन्ट्री! मालिकेत येणार मोठा ट्विस्ट; पाहा प्रोमो…

सिद्धार्थला “तू मितालीचा फोन नंबर कोणत्या नावाने सेव्ह केला आहेस?” असा प्रश्न विचारण्यात आला. यावर अभिनेता म्हणाला, “मितालीचा फोन नंबर मी बेबिंका या नावाने सेव्ह केला आहे. बेबिंका नावाचा गोड पदार्थ गोव्यात प्रचंड लोकप्रिय आहे आणि जेव्हा मला मिताली पहिल्यांदा भेटायला आली तेव्हा तिने माझ्यासाठी बेबिंका हा पदार्थ घेऊन आणला होता.”

हेही वाचा : “गरोदर असताना सातव्या महिन्यांपर्यंत…”, नम्रता संभेरावने सांगितला हास्यजत्रेमधील अनुभव; म्हणाली, “त्या क्षणी प्रचंड रडले…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आमच्या त्या पहिल्या भेटीपासून मितालीचं नाव माझ्या फोनमध्ये बेबिंका असं मी ठेवलेलं आहे.” असा खुलासा सिद्धार्थ चांदेकरने केला. दरम्यान, सिद्धार्थ चांदेकरच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेता लवकरच ‘झिम्मा २’ चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. त्याने दोन वर्षांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झिम्मा’ चित्रपटात सुद्धा कबीर हे पात्र साकारलं होतं.