आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर मराठी चित्रपटसृष्टीच नाही तर बॉलिवूडमध्येही स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे सिद्धार्थ जाधव. काही दिवसांपूर्वीच त्याचा सर्कस हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात तो रणवीर सिंगबरोबर काम करताना दिसला होता. या चित्रपटातील सिद्धार्थच्या अभिनयाचं कौतुक होताना दिसत आहे.

दमदार अभिनयासाठी ओळखला जाणारा सिद्धार्थ जाधव सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतो. नुकतीच त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. जी बरीच चर्चेत आहे. सिद्धार्थ जाधवने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो कलादर्पण पुरस्काराचे आहेत.

Ratan Tata, RK Laxman, Ratan Tata letter of thanks,
रतन टाटांनी आर. के. लक्ष्मण यांना पाठवलेल्या आभार पत्राची चर्चा
amazon river drying up
विश्लेषण: जगातील सर्वांत मोठी ॲमेझॉन नदी पडतेय कोरडीठाक……
vaastav the reality sanjay narverkar sanjay dutt
‘वास्तव’ सिनेमाला २५ वर्षे पूर्ण! देड फुट्याची भूमिका साकारणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्याने सांगितला संजय दत्तचा किस्सा
documentary, drama, documentary latest news,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले : तिसरा डोळा…
Pune bopdev ghat gangrape accuse sketch and video
Bopdev Ghat Gangrape: हेच ते नराधम! बोपदेव घाटात सामूहिक बलात्कार करणाऱ्या आरोपींचं स्केच, सीसीटीव्ही व्हिडीओ आला समोर
Emergency, Kangana Ranaut, Censor Board,
‘इमर्जन्सी’ चित्रपटातील दृश्यांना कात्री लावण्यास सहनिर्माती कंगना राणावत तयार, सेन्सॉर मंडळाची उच्च न्यायालयात माहिती
vivek agnihotri instagram
मॅनेजर उद्धट वागल्याने मुख्य अभिनेत्याला चित्रपटातून काढलं, विवेक अग्निहोत्रींचा खुलासा; म्हणाले, “स्टार किडच्या…”
Pragya Daya Pawar opposition to the role of Vanchit Bahujan Aghadi which is protesting in front of the house of intellectuals
‘वंचित’च्या भूमिकेचा स्त्री लेखिका-कार्यकर्तींकडून निषेध

वाचा- रणवीर सिंगला कॉपी करतो का? सिद्धार्थ जाधव स्पष्टच म्हणाला, “हो मी… “

सिद्धार्थ जाधवने फोटो शेअर करताना लिहिलं, “खास चित्रपट, खास भूमिका आणि आता खास पुरस्कार कलादर्पण पुरस्कार २०२२. सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता, धुरळा… मनापासून आभार!” आपल्या या पोस्टमध्ये त्याने दिग्दर्शक समीर विद्वांस यांना टॅग केलं आहे. तसेच चित्रपटाच्या संपूर्ण टीमचेही आभार मानले आहेत.

आणखी वाचा- “…म्हणून मी त्यांना चित्रपटात घेतो”, रोहित शेट्टीचं मराठी कलाकारांबाबत मोठं वक्तव्य

दरम्यान सिद्धार्थ जाधवच्या कामाबद्दल बोलायचं तर मराठी चित्रपटांनंतर सिद्धार्थने बॉलिवूड चित्रपटांमध्येही काही भूमिका साकारल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झालेल्या रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ चित्रपटात तो दिसला होता. याशिवाय मराठीतील ‘बालभारती’ हा त्याचा चित्रपट बराच चर्चेत होता. समीक्षकांच्या या चित्रपटाला चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या होत्या.