अभिनेत्री स्मिता गोंदकर ही तिच्या फोटोशूटमुळे कायमच सोशल मीडियावर चर्चेत असते. नृत्याबरोबरच तिच्या फॅशन स्टाइलचेही हजारो चाहते आहेत. ‘बिग बॉस मराठी’मध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्या चाहतावर्गामध्ये आणखीनच वाढ झाली. आता स्मिता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
आणखी वाचा – Video : “तरीही चिटकून डान्स करतेस आणि…” टीना-शालीनचा रोमान्स पाहून सलमान खान भडकला
स्मिता तिच्या कामामधून वेळ काढत व्हॅकेशन एण्जॉय करताना दिसली. ती व्हॅकेशनसाठी नेमकी कुठे गेली होती? हे तिने उघड केलं नाही. पण यादरम्यान ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथील फोटो स्मिताने शेअर केला आहे. या फोटोमध्ये तिचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.
स्मिताने यामध्ये काळ्या रंगाची बिकिनी परिधान केली आहे. तसेच स्वमिंग पूलमध्ये बसलेला तिचा हा फोटो आहे. पण या फोटोमागेही एक वेगळीच गंमत आहे. ती ज्या हॉटेलमध्ये थांबली होती तेथीलच हॉटेल कर्मचाऱ्यांनी तिचा हा फोटो काढला आहे. स्मिताने फोटो शेअर करत स्वतःच याबाबत सांगितलं.
स्मिता म्हणाली, “जेव्हा हॉटेल कर्मचारी परफेक्ट फोटो काढतात” म्हणजेच स्मिताचा हा फोटो हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी काढला असल्याचं दिसून येतं. स्मिताच्या या फोटोवर नेटकऱ्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत. काहींनी स्मिताला ट्रोल केलं आहे तर काहींनी तिच्या या हॉट लूकचं कौतुक केलं आहे.