Sonali Khare Shared A Post On Sanjay Jadhav’s Birthday : संजय जाधव दिग्दर्शित ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. यापूर्वी चित्रपटाच्या दोन्ही भागांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. हा चित्रपट आज (१८ जुलै) प्रदर्शित झाला असून महत्त्वाची बाब म्हणजे आजच दिग्दर्शक संजय जाधवचा यांचा वाढदिवसासुद्धा आहे. त्यानिमित्ताने कलाकारांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत संजय जाधव यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

संजय जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तेजस्विनी पंडित, श्रेया बुगडे यांनीसुद्धा पोस्ट शेअर केल्या आहेत. अशातच लोकप्रिय अभिनेत्री सोनाली खरे हिनेसुद्धा संजय जाधवसाठी एक खास पोस्ट केली आहे. अभिनेत्रीने या पोस्टमधून त्यांचे कौतुक करीत आभार मानले आहेत. सोनालीने संजयबरोबरचे काही फोटो शेअर केले आहेत.

सोनालीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये संजय जाधवच्या वाढदिवसाचे सेलिब्रेशन होत असतानाचे फोटो पाहायला मिळत आहेत. यावेळी सोनालीने पोस्टला “५५ व्या वाढदिवसाच्या शुभेच्छा संजयदादा. एका वडिलांप्रमाणे तू माझी काळजी घेतलीस. कायम मला पाठिंबा दिला, गरज पडल्यास माझे कानही ओढलेस. माझ्यासाठी तू इतकं सगळं केल्याबद्दल धन्यवाद”.

सोनाली पुढे म्हणाली, “तुझ्या वाढदिवसाच्या दिवशीच ‘येरे येरे पैसा ३’ प्रदर्शित झाला आहे ही किती छान गोष्ट आहे. मला माहीत आहे की, या चित्रपटाला खूप यश मिळणार आहे. कारण- तू खूप मनापासून हा चित्रपट बनवला आहेस. हे वर्ष तुझ्यासाठी आनंदाचं, भरभराटीचं जावो ही प्रार्थना. कधीच बदलू नकोस. कायम आहे तसाच राहा”.

सोनाली व संजय हे खूप पूर्वीपासून एकमेकांना ओळखत असून, त्यांनी वेळोवेळी तिला मदत केली असल्याचे तिने शेअर केलेल्या पोस्टमधून कळते. सोनालीसह इंडस्ट्रीत असे इतर काही कलाकारसुद्धा आहेत, ज्यांचे संजय जाधव आवडते दिग्दर्शक आहे. कलाकार अनेकदा त्यांच्याबद्दल मुलाखत, तसेच सोशल मीडियावरून बोलताना दिसतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, संजय जाधव यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, आज त्यांचा ‘येरे येरे पैसा ३’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्यामध्ये उमेश कामत, तेजस्विनी पंडित, सिद्धार्थ जाधव, संजय नार्वेकर, विशाखा सुभेदार हे कलाकार झळकणार आहेत. त्यासह संजय जाधव ‘पुन्हा एकदा सोड माडे ३’ या चित्रपटाचं छायाचित्रण करणार आहेत. तर अंकुश चौधरी या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहे. या चित्रपटात अशोक सराफ, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, सिद्धार्थ जाधव हे कलाकार झळकणार आहेत.